नाशिक : महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना या दोनच पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदांच्या नावांची स्पर्धा असताना वास्तविक शरद पवारांची राष्ट्रवादी स्पर्धेत देखील नाही. खुद्द पवारांनी देखील राष्ट्रवादीतून मुख्यमंत्रीपदासाठी आमचे कुठलेही नाव नाही, असे मध्यंतरी उघडपणे जाहीर केले होते. पण तरी देखील राष्ट्रवादीतली भावी मुख्यमंत्री यांची पोस्टरवरची नावे थांबली नव्हती. या पार्श्वभूमीवर मध्यंतरी शरद पवारांनी रोहित पवारांसारख्या तरुणांकडे नेतृत्व दिले पाहिजे, असे सूचक वक्तव्य करून त्यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या रिंग मध्ये टाकून ठेवले होते. परंतु आता त्यांनी रोहित पवारांचे नाव मागे सारून जयंत पाटलांचे नाव पुढे आणल्याचे समोर आले आहे.
शिवस्वराज्य यात्रेच्या समारोपात शरद पवारांनी जयंत पाटलांकडे राज्याच्या विकासाची आणि राजकीय प्रगतीची मोठी जबाबदारी येऊ शकते, असे सूचक विधान केले. त्यामुळे जयंत पाटलांच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली. खासदार अमोल कोल्हे यांनी उघडपणे जयंत पाटील हेच राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होऊ शकतील, असे स्पष्ट विधान केले. त्यावर स्वतः जयंत पाटलांनी आधीच माझ्याकडे मोठी जबाबदारी आहे, असे वक्तव्य करून मुख्यमंत्रीपदाच्या नावावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, जयंत पाटलांचे नाव आणि त्यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिली नाही.
NCP SP : पवारांच्या राष्ट्रवादीत आलेत नेते 10, 7 वाटेवर; पण “चाणक्य खेळी”च्या बातम्या शेकड्यांवर!!
एवढे सगळे असताना स्वतः शरद पवार मात्र मनातल्या मुख्यमंत्र्याचे नाव अजूनही उघडपणे घ्यायला तयार नाहीत. शरद पवारांना महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करायचे आहे हे उघड राजकीय गुपित सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, पण पवारांनी अद्याप सुप्रिया सुळे यांचे नाव जाहीररित्या मुख्यमंत्रीपदासाठी घेण्याची हिंमतच केलेली नाही. कारण एकदा का पवारांनी सुप्रिया सुळे यांचे नाव उघडपणे मुख्यमंत्रीपदासाठी समोर आणले की महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातल्या सगळ्याच घटक पक्षांचा विरोध त्यांना सुरू होईल आणि त्या विरोधापुढे सुप्रिया सुळे यांचे नाव टिकणार नाही, याची पक्की जाणीव पवारांना असल्यामुळे पवार उघडपणे त्यांचे नाव समोरच आणत नाही. “बफर” म्हणून कधी रोहित पवार, तर कधी जयंत पाटलांचे नाव ते पुढे आणून चाचपणी करताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे यांचे नाव त्यांनी अद्याप तरी राजकीय सेफ डिपॉझिटमध्येच ठेवले आहे.
अर्थात काहीही करून किंवा कसेही सुप्रिया सुळे यांचे नाव पवारांनी पुढे आणले, तर ते नाव हाणून पाडण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणाची फेरमांडणी करायला सगळ्या पवार विरोधी शक्ती एकवटतील आणि त्या शक्तींच्या विरोधात पवारांची ताकद कमी पडेल, हा इतिहासाचा दाखला आहे. मग भविष्यात काय होईल??
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App