बजेट सेशनपूर्वी विरोधी पक्षातील 146 खासदारांचे निलंबन रद्द; I.N.D.I.A आघाडी ब्रेन डेड झाल्याची भाजपची टीका

Suspension of 146 opposition MPs revoked ahead of budget session; BJP criticizes I.N.D.I.A Aghadi as brain dead

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान निलंबित करण्यात आलेल्या 146 खासदारांचे निलंबन रद्द करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मंगळवारी ही घोषणा केली. Suspension of 146 opposition MPs revoked ahead of budget session; BJP criticizes I.N.D.I.A Aghadi as brain dead

प्रल्हाद जोशी म्हणाले की, सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहे. आम्ही आधीच सांगितले होते की, इंडिया आघाडी फक्त फोटोशूटपुरती आहे. आघाडीचा मृत्यू जवळ आला आहे. ती ब्रेन डेड झाली आहे.

काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधींच्या आसाम दौऱ्यावर झालेला हल्ला आणि राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांचा मुद्दा उपस्थित केला. हेमंत सोरेन, लालू प्रसाद यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी सीबीआय आणि ईडीच्या गैरवापराचाही उल्लेख केला.

संसदेत मंगळवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पीयूष गोयल आणि 30 पक्षांचे 45 नेते उपस्थित होते.

यामध्ये काँग्रेस नेते कोडिकुनिल सुरेश, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) नेते टीआर बालू, शिवसेनेचे राहुल शेवाळे, समाजवादी पक्षाचे नेते एसटी हसन, जनता दल (युनायटेड) नेते रामनाथ ठाकूर आणि तेलुगू देसम पार्टीचे जयदेव गल्ला यांचा समावेश आहे.



निलंबित खासदार 31 जानेवारीपासून सभागृहात परतणार

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, केंद्र सरकारच्या वतीने मी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांना विरोधी खासदारांचे निलंबन रद्द करण्याची विनंती केली होती. त्यांनी हे निलंबन रद्द केले आहे. निलंबित खासदार बुधवारपासून (31 जानेवारी) सभागृहात परतणार आहेत.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एकूण 146 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. 46 खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. त्यापैकी 35 जणांना केवळ एका सत्रासाठी निलंबित करण्यात आले. त्याचवेळी 11 खासदारांच्या निलंबनाचे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आले होते.

बजेट म्हणजे काय?

घर चालवायला जसं बजेट हवं तसंच देश चालवायला बजेट हवं. आपण आपल्या घरासाठी जे बजेट बनवतो ते साधारणपणे एका महिन्याचे असते.

यामध्ये आपण या महिन्यात किती खर्च केला आणि किती कमावले याचा हिशोब करतो. देशाचा अर्थसंकल्पही अशाच पद्धतीने बनवला जातो. त्यात वर्षभराचा खर्च आणि कमाई यांचा हिशेब असतो.

Suspension of 146 opposition MPs revoked ahead of budget session; BJP criticizes I.N.D.I.A Aghadi as brain dead

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात