गोदावरी आरती ताब्यात घेण्याचा पुरोहित संघाचा प्रयत्न, प्रस्तावित समितीला विरोध; 10 कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता!!

विशेष प्रतिनिधी

नाशिक : काशीतील गंगा आरतीच्या धर्तीवर नाशिक मध्ये रामतीर्थावर 19 फेब्रुवारी शिवजयंतीपासून सुरू होणाऱ्या गोदावरी आरतीची संपूर्ण व्यवस्था ताब्यात घेण्याचा पुरोहित संघाचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोदावरी आरतीसाठी नेमलेल्या प्रस्तावित समितीला पुरोहित संघाने विरोध केला असून गोदावरी आरतीची सर्व व्यवस्था पुरोहित संघामार्फतच व्हावी, समितीमार्फत नको, अशी भूमिका पुरोहित संघाने मांडली आहे. An attempt by the Purohit Sangha to take over the Godavari Aarti

परंतु पुरोहित संघाच्या या वादग्रस्त भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या शिंदे – फडणवीस सरकारने उपलब्ध करून दिलेला 10 कोटींचा निधी सरकारकडे परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाशिकमध्ये येऊन सोमवारी बैठक घेतली. या बैठकीला नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, पुरोहित संघाचे सदस्य, प्रस्तावित गोदा आरती समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत पुरोहित संघाने गोदाआरतीची सर्व व्यवस्था वंशपरंपरेने गोदावरीची आरती करणाऱ्या पुरोहित संघाकडेच असावी, अशी भूमिका मांडली. पुरोहित संघाच्या गोदाआरतीला सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. पुरोहित संघाच्या विरोधात कोणीही बोलत नाही, असा दावा पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी पत्रकारांशी बोलताना केला. प्रस्तावित समितीत स्थानिक आखाड्याचे प्रतिनिधी नसल्याची तक्रारही त्यांच्या समवेत असलेल्या आखाडा परिषदेतल्या महंतांनी केली.

वंशपरंपरेने स्वखर्चाने गोदावरी आरती करणाऱ्या पुरोहित संघालाच शासनाने निधीचे बळ द्यावे. गोदाआरतीची सगळी व्यवस्था पुरोहित संघच करेल. त्यामध्ये नाशिकचे लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, गोदावरी भक्त सगळ्यांना सामावून घेईल, पण गोदा आरतीसाठी वेगळी समिती स्थापन करू नये, अशी भूमिका पुरोहित संघाने मांडली.

वास्तविक गोदावरी आरती हा उपक्रम शासकीय खर्चाने होणार असला, तरी प्रत्यक्षात व्यवस्थात्मक पातळीवर ही आरती पुरोहित संघच ताब्यात घेण्याची शक्यता पुरोहित संघानेच मांडलेल्या भूमिकेतून समोर आली आहे.

पण या सगळ्या वादावर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे भूमिका मांडताना नाशिक मधले कुठलेही वाद आरती मध्ये अडथळा ठरू नयेत. हे वाद आपापसांत मिटवावेत, असा इशारा दिला. अन्यथा शासनाने मंजूर केलेल्या 10 कोटींचा निधी देखील परत जाण्याची त्यामुळे भीती निर्माण झाली आहे.

An attempt by the Purohit Sangha to take over the Godavari Aarti

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात