वृत्तसंस्था
नवी दिल्ली : स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन खेळण्यासाठी आलेल्या सानियाने २०२२ हा तिचा शेवटचा हंगाम असल्याचे सांगितले आहे. म्हणजेच या वर्षी ती शेवटच्या वेळी कोर्टवर दिसणार आहे. बुधवारी तिला महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. Saniya Mirza announce tennis retirement
तिचा आणि युक्रेनच्या नादिया किचेनोकचा स्लोव्हेनियाच्या तामारा झिदानसेक आणि काजा जुवान यांनी ४-६६-७(५) असा पराभव केला. अशाप्रकारे महिला दुहेरीच्या पहिल्या सामन्यात ती पराभूत झाल्यानंतर बाहेर पडली. मात्र, सानिया आता ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीचा सामना खेळणार आहे. तिने अमेरिकेच्या राजीव रामसोबत हातमिळवणी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more