Samyukt Kisan Morcha : संयुक्त किसान मोर्चाच्या 11 नेत्यांची राहुल गांधींशी भेट; तिसऱ्या शेतकरी आंदोलनाला चिथावणी??

Samyukt Kisan Morcha

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बांगलादेशातील जमाते इस्लामीचा हिंसाचार आणि तिथल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतात चिंतेचे वातावरण असताना शेतकरी आंदोलनात अग्रभागी असलेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या 11 नेत्यांनी आज राहुल गांधींची ( rahul gandhi )संसदेमधल्या त्यांच्या चेंबरमध्ये येऊन भेट घेतली. योगेंद्र यादव यांच्यासह अन्य 10 नेते राहुल गांधींना भेटले त्यामुळे भारतात तिसऱ्या शेतकरी आंदोलनाला चिथावणी दिली गेली आहे का??, अशी शंका तयार झाली आहे.



किमान आधारभूत किंमत अर्थात मिनिमम सपोर्ट प्राईस एमएसपी ला कायद्याची गॅरंटी मिळाली पाहिजे, ही संयुक्त किसान मोर्चाची जुनी मागणी आहे. ती मोदी सरकारने स्वीकारली देखील होती. परंतु, दरम्यानच्या काळामध्ये संयुक्त किसान मोर्चाने त्याचबरोबर अन्य काही शेतकरी संघटनांनी आपल्या मागण्या बदलल्या आणि वाढविल्या. त्याचदरम्यान दोन वेळा शेतकरी आंदोलने चिघळली. दुसऱ्या शेतकरी आंदोलनात तर थेट लाल किल्ल्यावर खालीस्तानी झेंडा फडकविण्याची हिमाकत शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली फुटीरतावाद्यांनी केली. शेतकरी आंदोलनाला दिल्लीमध्ये एवढे हिंसक वळण लागले की थेट पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्यात त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला होता.

त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुका झाल्या भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही, तरीही मोदी सरकारच अस्तित्वात आले. मोदी सरकारने पहिले बजेट सादर करून शेतकऱ्यांसाठी काही सवलती जाहीर केल्या. परंतु, त्या सवलती अपुऱ्या असल्याचे कारण दाखवत संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी विरोधकांशी संधान साधायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात खरी लोकशाही कुठल्याही सदनात किंवा भावनात बसून सिद्ध होत नाही तर रस्त्यावर सिद्ध होते, असे वक्तव्य योगेंद्र यादव यांनी केले होते.

या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांमध्ये बांगलादेशातल्या हिंसक घटना, तिथले विद्यार्थी आंदोलन आणि त्यानंतरच्या अस्थिरतेच्या राजकीय घडामोडी यातून बरीच आंतरराष्ट्रीय कटकारस्थाने उघडकीस आली. बांगलादेशातल्या अस्थिरतेचे भारतातल्या राजकीय आणि सामाजिक स्थैर्यावर दुष्परिणाम होण्याची चिन्हे दिसत असताना संयुक्त किसान मोर्चाच्या 11 नेत्यांनी राहुल गांधींची दिल्लीत येऊन भेट घेतली. एमएसपी संदर्भात कायद्याच्या गॅरंटीचे खासगी विधेयक राहुल गांधींनी संसदेत मांडावे यावर त्यांच्यात एकमत झाले. यानिमित्ताने शेतकरी आंदोलन पुन्हा पेटविण्याचा इरादा समोर आला.

Samyukt Kisan Morcha met Lok Sabha LoP Rahul Gandhi in his chamber in Parliament House,

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात