हायकोर्टाने 29 जुलै रोजी केजरीवालांच्या अर्जावर निर्णय राखून ठेवला होता.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal )यांनी सीबीआयच्या अटकेला बेकायदेशीर ठरवून आव्हान दिले होते पण दिल्ली उच्च न्यायालयाने ते फेटाळले आहे. दिल्ली मद्य धोरणात सीबीआयचा समावेश असलेल्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
अरविंद केजरीवाल सुटकेसाठी ट्रायल कोर्टात जाऊ शकतात, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. केजरीवाल 115 दिवस तुरुंगात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच ED प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे, मात्र सीबीआय प्रकरणातील याचिका फेटाळल्यामुळे केजरीवाल यांना सध्या तुरुंगातच राहावे लागणार आहे.
कथित अबकारी धोरण घोटाळ्यातून निर्माण झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी केजरीवाल आणि सीबीआयच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हायकोर्टाने 29 जुलै रोजी केजरीवालांच्या अर्जावर निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आज उच्च न्यायालयाने निर्णय दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more