राज्यातील उर्वरित जागांवरही आमचे मित्र आणि कार्यकर्ते पूर्णपणे तयार असल्याचे सांगितलं आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : येत्या काही महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात मुख्य लढत काँग्रेस, ठाकरे गट आणि पवार गट यांच्या महाविकास आघाडी (एमव्हीए) आणि भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीमध्ये आहे.
दोन्ही आघाड्यांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र, या दरम्यान आता, विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा भाग असलेल्या आम आदमी पार्टीने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे.
आम आदमी पक्षाने आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकट्याने लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. आम आदमी पार्टी मुंबईतील सर्व 36 विधानसभा जागांवर उमेदवार उभे करणार आहे. आम आदमी पार्टी, महाराष्ट्राच्या अध्यक्षा प्रीती मेमन यांनी दावा केला आहे की उर्वरित राज्यातही आमचे मित्र आणि कार्यकर्ते पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more