Vijender Gupta : भाजपने आमदार विजेंद्र गुप्ता यांच्यावर दिल्लीत सोपवली मोठी जबाबदारी!

Vijender Gupta

जाणून घ्या, आता कोणत्या राजकीय भूमिकेत दिसणार आहेत?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भाजप आमदार विजेंद्र गुप्ता आता दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते असतील. सोमवारी (५ ऑगस्ट) दिल्ली भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पक्ष कार्यालयात सहप्रभारी डॉ.अलका गुर्जर, प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि संघटनेचे सरचिटणीस शपवान राणा यांच्या उपस्थितीत पक्षाच्या सातही आमदारांची बैठक झाली.

या बैठकीत विजेंद्र गुप्ता यांची दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यापूर्वी दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधुरी होते. विजेंद्र गुप्ता यांच्याकडे दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दुसऱ्यांदा मिळाली आहे.



कोण आहेत विजेंद्र गुप्ता?

याआधी विजेंद्र गुप्ता यांनी 2015 ते 2020 पर्यंत दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. रोहिणीतून भाजपचे आमदार आहेत. ते डीडीएचे माजी सदस्य आहेत. ते MCD स्थायी समितीचे माजी अध्यक्षही राहिले आहेत. 2015 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतही विजेंद्र गुप्ता यांनी भाजपच्या तिकिटावर रोहिणीमधून विजय मिळवला होता. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 3 जागा जिंकल्या होत्या, त्यात विजेंद्र गुप्ता यांचाही समावेश होता.

भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांनी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून शिक्षण घेतले. 1983 मध्ये जनता विद्यार्थी मोर्चाचे सचिव म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचा जन्म 14 ऑगस्ट 1963 रोजी झाला.

रामवीर सिंह बिधुरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आणि आता ते खासदार झाले आहेत. लोकसभा सदस्यपदी निवड झाल्यानंतर रामवीर सिंह बिधुरी यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. विधुरी दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले आहेत. यापूर्वी ते बदरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार होते.

बिधुरी यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामाही सभापती राम निवास गोयल यांच्याकडे सुपूर्द केला होता. यानंतर दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. भाजपच्या बैठकीनंतर सर्वसहमतीने विजेंद्र गुप्ता यांच्यावर ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

MLA Vijender Gupta

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात