Devendra Fadnavis : चांदीवाल समितीचा अहवाल ठाकरे – पवार सरकारच्या काळातच आला; देशमुखांच्या दाव्यातली फडणवीसांनी काढली हवा!!

Devendra fadnavis refutes charges of anil deshmukh over chandiwal report

विशेष प्रतिनिधी

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख  (Anil Deshmukh) आणि आजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis ) यांच्यातल्या कलगीतुऱ्यात चांदीवाल समितीच्या अहवालाचा विषय तापला. तो 1400 पानांचा अहवाल जाहीर करण्याचे आव्हान देशमुखांनी फडणवीसांना दिले. पण तो अहवाल ठाकरे – पवार सरकारच्या काळात आल्याचे सांगून फडणवीसांनी देशमुखांच्या दाव्यातली हवा काढली.

उद्धव ठाकरेंविरोधात खोटी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर दबाव आणला, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. त्याला देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले होते. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्या कलगीतुरा रंगला.

अनिल देशमुखांनी आज चांदीवाल आयोगाच्या अहवालाची प्रत दाखवत पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. खुनाच्या गुन्हातील अरोपीच्या कुबड्यावर देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्याची वेळ आली, अशी टीका त्यांनी केली. तसेच महायुती सरकार हा अहवाल प्रसिद्ध करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. या आरोपाला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी देशमुखांना आरसा दाखवला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले :

चांदीवाल आयोगाचा अहवाल महाविकास आघाडीच्या काळात आला होता. मग तो अहवाल प्रसिद्ध का गेला नाही?, याचे उत्तर देशमुखांनी आधी द्यावे. मूळात परवमीर सिंह यांना महाविकास आघाडीने आयुक्त केले होते. अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांनी आरोप केले होते. खरं तर विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून एखादा पोलीस आयुक्त गृहमंत्र्यांवर आरोप कसे करेल?? त्यामुळे या सगळ्या कपोलकल्पित गोष्टी आहेत. यात काहीही अर्थ नाही.

अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या सांगण्यावरूनच हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित केले होते. यात केंद्र सरकारचा काहीही संबंध नव्हता. त्यावेळी न्यायालयाने जे आदेश दिले, ते बघितले तर या सर्व गोष्टी स्पष्ट होतील. पण रोज अशाप्रकारे कुणी येऊन बोलत असेल तर त्यांच्या स्तरावर जाऊन या प्रकरणावर बोलायची माझी इच्छा नाही. पण शेवटी सत्य सर्वांना माहिती आहे. सत्य जनतेसमोर आले आहे.



अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले होते?

अनिल देशमुख यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह व सचिन वाझे यांनी माझ्यावर केलेल्या आरोपावर न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 11 महीने चौकशी केली. या चौकशी दरम्यान सचिन वाझे यांनी उलट चौकशीत कोर्टामध्ये स्पष्टपणे सांगितले होते की, अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पीए ने मला पैसे मागितले नाही आणि मी त्यांना कधी पैसे दिले नाही. आता तोच आरोप करत आहे, खुनाच्या गुन्हातील अरोपीच्या कुबड्यावर राजकीय सुडबुध्दीने देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्याची वेळ आली, अशी टीका त्यांनी केली होती.

याशिवाय न्यायमूर्ती चांदीवाल यांनी माझ्यावरील आरोपाच्या चौकशीचा 1400 पानांचा अहवाल हा राज्य सरकारकडे 2 वर्षांपूर्वी सादर केला आहे. परंतु 2 वर्षांपासून तो अहवाल राज्य सरकार लोकांसमोर आणत नाही. यासाठी मी अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून न्यायमूर्ती चांदीवाल यांचा अहवाल सार्वजनिक करण्यासाठी विनंती केली आहे, असा आरोपही त्यांनी केला होता.

मात्र, चांदीवाल समितीचा अहवाल ठाकरे सरकारच्या काळात आल्याचे सांगून फडणवीसांनी देशमुखांच्या दाव्यातली हवा काढली.

Devendra fadnavis refutes charges of anil deshmukh over chandiwal report

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात