विशेष प्रतिनिधी
धाराशिव : मनसेप्रमुख राज ठाकरे( Raj Thackeray )यांनी आरक्षणाबाबत परखड भूमिका मांडल्यावर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्या समर्थकांनी राज ठाकरे उतरलेल्या हॉटेलवर जाऊन राडा घातला. राज ठाकरे यांनी रूम मधून खाली येऊन मराठा आंदोलकांशी बोलायची तयारी दाखविली तरी आंदोलकांनी त्यांच्याशी बोलण्याऐवजी मनोज जरांगे यांच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या.
राज ठाकरे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्राला आक्षणाची गरज नाही, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. यानंतर राज ठाकरे यांना जाब विचारण्यासाठी मनोज जरांगे समर्थक त्यांच्या भेटीसाठी गेले. राज ठाकरे धाराशिवमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले, त्या ठिकाणी मराठा आंदोलक पोहोचले. त्यांनी तिथे घोषणाबाजी केली तेव्हा राज ठाकरे आपल्या रूममधून उतरून खाली आले आणि माझ्याशी बोलायचं असेल तर घोषणा बंद करा वर येऊन माझ्याशी बोला असे सांगितले. पण राज ठाकरे यांच्याबरोबर त्यांच्या रूममध्ये जाऊन चर्चा करणे ऐवजी मराठा आंदोलकांनी हॉटेलमध्ये आणि हॉटेल भोवती राडा घातला. मनोज जरांगे यांच्या समर्थनाच्या जोरदार घोषणा दिल्या. माझ्याशी बोलायचं आहे ना? मग वरती या. या घोषणा आधी बंद करा, असं राज ठाकरे म्हणाले. पण यानंतर राज ठाकरे यांनी आपल्याशी अरेरावीची भाषा केली, असा कांगावा कार्यकर्त्यांनी केला. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी राज ठाकरे मुर्दाबाद आणि मनोज जरांगे समर्थनाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
यानंतर मराठा आंदोलकांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे आमच्याशी रुबाबात बोलले, हुकूमशाही पद्धतीने बोलले. तुम्ही शांत बसा, घोषणा बंद करा, बोलायचं असेल तर दोघं जण या. मी त्यांना बोललो, आलो तर आम्ही सर्व येणार. पण ते नाही म्हणाले. राज ठाकरे यांनी अरेरावीची भाषा केली. आता उद्या राज ठाकरे उद्या कशी प्रेस कॉन्फरन्स घेतात ते बघतो. इथे धाराशिव मध्ये दादागिरीची भाषा चालणार नाही, अशी दमबाजी मराठा आंदोलकांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more