अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि ब्रिटनमध्ये जे काही घडत आहे, ते.. Kangana Ranauts reaction on Sheikh Hasina leaving the country
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा देऊन देश सोडला आहे. सोमवारी रात्री त्या विमानाने गाझियाबाद येथील हवाई दलाच्या हिंडन एअरबेसवर पोहोचल्या. शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतल्यावर बॉलिवूड अभिनेत्री आणि लोकसभा खासदार कंगना रणौत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाला धार्मिक दृष्टीकोन देत कंगना रणौत यांनी एक्स-पोस्टद्वारे या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुस्लिम देशांमध्ये कोणीही सुरक्षित नसल्याचे कंगनाने म्हटले आहे. यासोबतच कंगना रणौत यांनी भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे कौतुकही केले आहे.
कंगना रणौतने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टद्वारे बांगलादेशातील सद्य परिस्थिती आणि माजी पंतप्रधान शेख हसीना देश सोडून भारतात आल्याबाबत भाष्य केले आहे. त्यांनी एक्स-पोस्टमध्ये लिहिले आहे की, “भारत ही आपल्या आजूबाजूच्या सर्व इस्लामिक प्रजासत्ताकांची मूळ मातृभूमी आहे. बांगलादेशच्या माननीय पंतप्रधानाना भारतात सुरक्षित वाटतं याचा आम्हाला सन्मान आणि आनंद वाटतो. पण जे भारतात राहतात आणि विचारत राहतात. हिंदु राष्ट्र का बरं का? रामराज्य का बरं? हे आता स्पष्ट आहे.
मंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार रणौत यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “मुस्लिम देशांमध्ये कोणीही सुरक्षित नाही, अगदी मुस्लिमही नाही. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि ब्रिटनमध्ये जे काही घडत आहे ते दुर्दैवी आहे. आम्ही भाग्यवान आहोत कारण आम्ही रामराज्यात राहत आहोत. जय श्रीराम.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more