लवकरच सुपर अॅप बनवण्याचे कामही रेल्वेकडून सुरू आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने मोदी सरकार 3.0 ची योजना तयार केली आहे. यात प्रवाशांसाठी 24 तास तिकीट परतावा योजना, सर्व रेल्वे सुविधांसाठी सुपर ॲप, तीन आर्थिक कॉरिडॉर आणि स्लीपर वंदे भारत ट्रेन यासह अनेक सुविधांवर लक्ष केंद्रित केले जाईल. एएनआय या वृत्तसंस्थेला सरकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.Revival of railways will happen in Modi government 3.0 Investment worth Rs 10 to 12 lakh crore
रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की, नवीन तिकीट प्रणाली अंतर्गत 24 तासांच्या आत तिकीट परतावा मिळेल याची खात्री केली जाईल. सध्या, तिकीट परतावासाठी तीन दिवस ते एक आठवडा लागतो.
सुपर ॲप
लवकरच सुपर अॅप बनवण्याचे कामही रेल्वेकडून सुरू आहे. या सुपर ॲपद्वारे प्रवासी एकाच ठिकाणी सहजपणे रेल्वे तिकीट बुक आणि रद्द करू शकतात. याशिवाय या ॲपद्वारे ट्रेनमध्ये खाद्यपदार्थही मागवता येतात.
पीएम रेल प्रवासी विमा योजना
नवीन सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत ‘पीएम रेल यात्री विमा योजना’ सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याशिवाय पुढील 5 वर्षांत रेल्वेमध्ये 10 ते 12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, जेणेकरून भारतीय रेल्वे जागतिक दर्जाची रेल्वे बनू शकेल.
वंदे भारत ट्रेन तीन श्रेणींमध्ये चालवण्याचा सरकार विचार करत असल्याचे अहवालात सांगण्यात आले. पहिली वंदे भारत मेट्रो आहे जी 100 किलोमीटरपेक्षा कमी मार्गांवर चालवली जाईल. वंदे चेअर कार 100 ते 550 किलोमीटरच्या मार्गावर धावणार आहे. त्याचवेळी, स्लीपर वंदे भारत ट्रेन 550 किलोमीटरहून अधिक अंतरावर धावेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App