मतदारसंघातून उमेदवारी घेतली मागे Ghulam Nabi Azad will not contest the Lok Sabha elections
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गुलाम नबी आझाद यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. यासह त्यांनी अनंतनाग मतदारसंघातून आपली उमेदवारी मागे घेतली आहे. आझाद यांना त्यांच्याच पक्ष डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीने (DPAP) अनंतनाग बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र निवडणुकीपूर्वी त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला.
गुलाम नबी आझाद यांनी अनंतनाग येथील पक्षाच्या बैठकीत लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली. आझाद यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केल्यानंतर आता या जागेवर नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांच्यात थेट लढत होणार आहे.
मात्र, भाजपने अद्याप अनंतनाग-बारामुल्ला मतदारसंघातून आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मूमध्ये सांगितले की, भाजपला काश्मीरमध्ये कोणतीही घाई नाही. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि बारामुल्ला येथील नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार ओमर अब्दुल्ला यांनी उमेदवाराचे नाव जाहीर न केल्याबद्दल भाजपची टोला लगवाला आणि म्हटले की, भाजपला काश्मीरमधील पराभवाची जाणीव आहे, म्हणून ते निवडणूक लढवत नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App