सून घरी येऊन 40 वर्षे झाली, तरीही परकी मानली; वडीलधारे बोलल्यावर तळपायाची आग मस्तकी गेली!!

Ajit pawar targets sharad pawar over his strictures sunetra is pawar but came from outside!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : सून घरी येऊन 40 वर्षे झाली, तरीही परकी मानली; वडीलधारे बोलल्यावर तळपायाची आग मस्तकी गेली!! Ajit pawar targets sharad pawar over his strictures sunetra is pawar but came from outside!!

शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना “बाहेरून आलेल्या पवार” म्हटल्यावर सुनेत्रा पवारांना अश्रू आले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतापले. त्यांनी पवारांना आणि त्यांच्या समर्थकांना घेरले. वक्तव्य अंगलट येताच पवारांनी घुमजाव करत कानावर हात ठेवले. पण अजितदादांनी अतिशय तिखट शब्दांत पवारांना फटकारले.



अजित पवार म्हणाले :

  • 40 वर्ष झाली सून घरी येऊन, तरी देखील तिला परकी मानली. महिलांनी याचा विचार करायला हवा. वडीलधाऱ्या लोकांनी असं बोलल्यावर तळपायाची आग मस्तकात जाते. बारामतीच्या विद्यमान खासदारांचे गेल्या 10 वर्षातले दिसेल असे एक काम सांगा. मी केलेलीच कामे त्यांनी स्वतःच्या जाहीरनाम्यात टाकली. त्यांचा जाहीरनामा पाहिल्यावर मीच केलेली कामे दिसली.
  • विरोधक आरोप करतात. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप मंत्री झाल्यावर होतात. कामेच नाही केली तर कसे आरोप होतील?? भूखंड घोटाळा, दाऊदशी कुणाचे नाव जोडले?? हे आरोप कुणावर झाले?? त्यात सत्य नव्हते. पण आरोप झाले ना!!
  • काहीजणांनी 50 वर्षे काम केले. आता त्यांनी म्हटले पाहिजे, इतरांना काम करू द्या. पण ते म्हणतील, एवढीच वेळ मत द्या. पण किती वेळ द्यायचे??, ते एकदा सांगा.
  • खासदार राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना होऊ शकत नाही. बारामतीसारखे इतर तालुक्यात काम केले, तर ते मला बिनविरोध लोक निवडून देतील. बारामतीमध्ये कायदा-सुव्यवस्था सगळ्या बाबी चांगल्या आहेत. सहकार क्षेत्रातील सर्व ठिकाणी माझे बारकाईने लक्ष आहे. मला आजपर्यंत साथ दिली तशी आता भावनिक न होता साथ द्यावी.
  • काहीजण भेटायला येतील. डोळ्यांत पाणी आणतील. एवढ्या वेळेस म्हणतील. पण आता माझेच ऐका. एवढ्या वेळेस मी हात जोडून सांगतो. अनावश्यक भावनिक न होता मला साथ द्या.

Ajit pawar targets sharad pawar over his strictures sunetra is pawar but came from outside!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात