मोदी सरकार सर्व मुस्लिमांची काळजी घेईल ; शाहनवाज हुसेन यांनी व्यक्त केला विश्वास!

कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी काम करणाऱ्या मोदींच्या नेतृत्वावर आम्ही खूश आहोत, असंही म्हणाले आहेत. Modi government will take care of all Muslims Shahnawaz Hussain expressed his belief

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप देशातील मुस्लिमांना आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करत आहे. या संदर्भात भाजप नेते सय्यद शाहनवाज हुसैन यांनी शनिवारी मोठे वक्तव्य केले आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी पक्षाने मुस्लिम समाजातील काही लोकांनाच उमेदवारी दिली असली तरी पक्ष सर्व मुस्लिमांची काळजी घेईल, असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार ‘सबका साथ, सबका विकास’ हे ब्रीदवाक्य घेऊन काम करत आहे, जे कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू देत नाही.

हुसेन पुढे म्हणाले की, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री पद हे धर्म किंवा जातीच्या आधारावर ठरवले जात नाही. पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि समानतेने काम करणे महत्त्वाचे असून कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी काम करणाऱ्या मोदींच्या नेतृत्वावर आम्ही खूश आहोत.

ते म्हणाले, मोदींवर सर्व मुस्लिमांचे प्रेम आहे आणि मुस्लिमांनाही माहित आहे की त्यांना भारतासारखा देश, हिंदूसारखा मित्र आणि मोदींसारखा नेता मिळू शकत नाही. तसेच, जम्मूतील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपचे उमेदवार जिंकतील असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले की, विरोधी पक्षाचे नेते भाजपमध्ये सामील होत आहेत कारण “कोणालाही बुडत्या बोटीत राहायचे नाही. मोदींची बोट किनाऱ्यावर आहे हे सर्वांनाच माहीत आहे.”

Modi government will take care of all Muslims Shahnawaz Hussain expressed his belief

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात