Ram Janmabhoomi : राम जन्मभूमी मंदिर चोरी मामला; चंपत राय यांचे कौतुक करून ट्रस्ट कडून राजीनामा मंजूर!!

Ram Janmabhoomi

वृत्तसंस्था

अयोध्या, (उत्तर प्रदेश) : Ram Janmabhoomi  अयोध्यातील श्रीराम जन्मभूमी मंदिरातल्या चोरीच्या मामल्यामध्ये राम जन्मभूमी ट्रस्टने सरचिटणीस चंपत राय यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचा राजीनामा आज मंजूर केला.Ram Janmabhoomi

राम मंदिरातील चोरीचा मामला समोर आल्यानंतर राम जन्मभूमी ट्रस्टची बैठक झाली. त्या बैठकीसमोर चंपत राय आणि अनिल मिश्रा या दोन ट्रस्टींचे राजीनामे विचारण्यासाठी ठेवण्यात आले. ट्रस्टने एकमताने दोघांचे राजीनामे मंजूर केले.Ram Janmabhoomi

चंपत राय (सरचिटणीस) आणि अनिल मिश्रा (विश्वस्त) यांच्या राजीनाम्याबाबत, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी जी महाराज यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.Ram Janmabhoomi



– स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले :

– राम जन्मभूमी ट्रस्टच्या घटनेनुसार एकदा का राजीनामा सादर केला गेला, की तो स्वीकारायचा की नाकारायचा हा निर्णय ट्रस्टच्या हातात नाही. त्यामुळे चंपत राय आणि अनिल मिश्रा त्यांनी दिलेले राजीनामे स्वीकारण्याचा मुद्दा आमच्या हातात उरला नव्हता; आम्हाला ते राजीनामे स्वीकारावेच लागले.

त्याचवेळी राम जन्मभूमी ट्रस्टने चंपत राय जी यांनी केलेल्या सेवेची दखल घेतली आणि तिचे कौतुकही केले. त्यांनी अत्यंत उदार भावनेने स्वतःहून हा निर्णय घेतला. राम मंदिराच्या उभारणीसाठी त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. अगदी सुरुवातीपासून, जेव्हा या प्रकल्पाबाबत कोणतीही मोठी हालचाल सुरू झाली नव्हती, तेव्हापासून ते आजपर्यंत. त्यांच्या संपूर्ण कार्याचा आणि या परिस्थितीत त्यांनी दाखवलेल्या उदारतेचा आदर राखून आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारला.

– राम जन्मभूमी ट्रस्टच्या भविष्यातील आवश्यक व्यवस्था करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ही जबाबदारी श्री कृष्ण मोहन जी यांच्यावर सोपवण्यात आली आहे, जे माझ्यासोबत येथे हंगामी सरचिटणीस म्हणून उपस्थित आहेत.

– २८०० मौल्यवान वस्तूंची यादी

– प्रसार माध्यमांमधून अनेक जण असे आरोप करत आहेत की इतर अनेक मौल्यवान अर्पण आणि दान केलेल्या वस्तूही कुठल्याही खुणेविना गायब झाल्या. पण या सर्व वस्तूंची नोंद असलेला रजिस्टर आम्ही पत्रकारांना दाखविण्यासाठी आणला आहे; आम्ही संबंधित सर्व वस्तूंचा तपशील सादर करू. आज आम्ही हे सर्व पत्रकारांच्या समोर मांडणार आहोत. शिवाय, आम्हाला तुम्हाला हे सांगायचे आहे, की आमच्याकडे अशा २८०० वस्तूंची यादी असलेला रजिस्टर आहे आणि त्या सर्व सुरक्षित आहेत. ज्या वस्तूंची चर्चा झाली आहे, त्यापैकी या पाच विशिष्ट वस्तू आम्ही केवळ नमूना म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी आणल्या आहेत. तथापि, हे सर्व लक्षात घेऊन, आम्ही पुढील काम अशा प्रकारे करू की त्यात कुणालाही थोडी सुद्धा त्रुटी आढळणार नाही. राम जन्मभूमी ट्रस्ट इथून पुढे सर्व कार्याच्या निर्दोष अंमलबजावणीसाठी कटिबद्ध असेल.

– राम जन्मभूमी साठी आवश्यक असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी एक समिती स्थापन केली असून ट्रस्टची 22 जुलै रोजी पुन्हा बैठक होणार आहे. तोपर्यंत सरकारने नेमलेल्या स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमचा अहवाल आपल्यापर्यंत आला असेल, अशी आमची अपेक्षा आहे. 22 जुलैच्या बैठकीत त्या अहवालावर चर्चा होईल त्याचबरोबर ट्रस्टवर आणखी काही विश्वस्त नेमण्यासंदर्भात विचार केला जाईल.

– राम मंदिरातील चोरी संदर्भात ट्रस्टची भूमिका स्पष्ट आहे, की चोरी करणाऱ्यांना कठोरातले कठोर शासन करावे. गुन्हेगारांना आणि त्यांच्या लपून बसलेल्या साथीदारांना सरकारने पकडावे आणि त्यांनाही कठोर शिक्षा करावी.

Ram Janmabhoomi Temple theft case: Trust accepts resignation after praising Champat Rai!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात