संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…


राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे यावर प्रतिक्रिया दिली आहे

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केरळच्या वायनाडमधील काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव’ बद्दल अपमानास्पद टिपण्णी केल्यानंतर त्यांना दोषी ठरवून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे.  राहुल गांधींना काल गुजरातच्या सुरत कोर्टात मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर कायद्यानुसार त्यांचे संसदेचे सदस्यत्व संपुष्टात आले. Rahul Gandhi first reaction after cancellation of membership of Parliament

संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे यावर प्रतिक्रिया दिली आहे, ‘’मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे. मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे.”  असं त्यांनी म्हटलं आहे. तर राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द झाल्याने काँग्रेस व विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून पंतप्रधान मोदी व भाजपावर जोरदार टीका टिप्पणी सुरू आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचेही लोकसभा सदस्यत्व करण्यात आले होते रद्द; जाणून घ्या इतिहास

राहुल गांधींना मोदी आडनावाबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. त्यांना उच्च न्यायालयात अपील करता यावे, यासाठी न्यायालयाने ३० दिवसांचा वेळ दिला असला तरी शिक्षेला स्थगिती दिलेली नाही. विशेष म्हणजे न्यायालयाने त्यांना जामीनही दिला आहे.

राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक रॅलीत, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकसारखेच का आहे? सगळ्या चोरांची आडनावं मोदी का असतात? असे विधान केले होते. यानंतर भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर सुरत सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता.

Rahul Gandhi first reaction after cancellation of membership of Parliament

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात