पंतप्रधान मोदी ‘वन वर्ल्ड टीबी समिट’ला संबोधित करणार; वाराणसीला देणार १ हजार ७८० कोटींची भेट

PM Modi new

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या २४ मार्च रोजी वाराणसीतील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे सकाळी साडेदहाच्या सुमारास ‘वन वर्ल्ड टीबी समिट’ला संबोधित करतील. यानंतर, पंतप्रधान दुपारी १२ वाजेच्या सुमारास पंतप्रधान संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या मैदानावर १७८० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. PM Modi to address One World TB Summit 1780 crore gift to Varanasi

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त पंतप्रधान मोदी ‘वन वर्ल्ड टीबी समिट’ला संबोधित करतील. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि स्टॉप टीबी भागीदारीद्वारे या शिखर परिषदेचे आयोजन केले जात आहे. २००१मध्ये स्थापित स्टॉप टीबी ही संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखालील संस्था आहे, जी टीबीने बाधित लोक, समुदाय आणि देशांसाठी काम करते.

गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान मोदींनी वाराणसीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि आसपासच्या भागात राहणाऱ्या लोकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे. या दिशेने आणखी एक पाऊल टाकत, पंतप्रधान संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या मैदानावर १ हजार ७८० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

काळजी घ्या! करोना अजून संपलेला नाही; महाराष्ट्र आणि दिल्लीसह आठ राज्यांमध्ये आणखी रुग्णांची नोंद – आरोग्य मंत्रालय

कारखियांव येथे बांधलेल्या एकात्मिक पॅक हाऊसमध्ये वाराणसी आणि त्याच्या आसपासच्या भागातील शेतकरी, निर्यातदार आणि व्यापार्‍यांना फळे आणि भाज्यांची प्रतवारी, वर्गीकरण आणि प्रक्रिया करणे आता शक्य होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान हा प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. हा प्रकल्प वाराणसी आणि परिसरातील कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरेल. याशिवाय पंतप्रधान वाराणसी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत राजघाट आणि महमूरगंज सरकारी शाळांच्या पुनर्विकासाचे काम, शहरातील अंतर्गत रस्त्यांचे सुशोभीकरण, शहरातील सहा उद्याने आणि तलावांचा पुनर्विकास यासह विविध प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील.

PM Modi to address One World TB Summit 1780 crore gift to Varanasi

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात