विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींशी टक्कर घेणे राहिले बाजूला, पण सुरत कोर्टाचा निकाल आल्यानंतर केंद्रातल्या राजकारणाने असे वळण घेतले आहे, की राहुल गांधींची खासदारकी वाचवण्यासाठी काँग्रेसला आता विरोधकांच्या एकजुटीची गरज भासू लागली आहे!!Congress wants opposition unity to save rahul Gandhi’s parliament membership, but will other regional parties co-operate??
राहुल गांधींनी लंडनमध्ये केलेली भाषणे आणि त्यानंतर सुरतच्या कोर्टाचा आलेला निकाल या दुहेरी राजकीय आणि कायदेशीर कात्रीत राहुल गांधींचे संसद सदस्यत्व अर्थात खासदारकी अडकली आहे. देशातल्या सर्वच चोरांची आडनावे मोदी कशी??, हा कर्नाटकात केलेला सवाल राहुल गांधींच्या आता कायदेशीरदृष्ट्या अंगलट आला आहे. सुरत कोर्टाने त्यांना दोषी ठरवून दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेविरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याची त्यांना संधी आहे. त्यासाठी त्यांना सुरत कोर्टाने जामीनही मंजूर केला आहे, पण त्यांना रितसर वरिष्ठ न्यायालयातून शिक्षेला स्थगिती आणावी लागेल. अन्यथा प्रशासनाने राहुल गांधींच्या शिक्षेची प्रत लोकसभेच्या सभापतींना सादर केली, तर त्यावर कायदेशीर कारवाई करून लोकसभेचे सभापती राहुल गांधींची खासदारकी अर्थात लोकसभा सदस्यत्व उर्वरित काळासाठी रद्द करू शकतात. याचा अर्थच राहुल गांधींची खासदारकी धोक्यात आहे आणि ते पुढील 6 वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास देखील अपात्र ठरू शकतात.
सुरतच्या निकालात दडलेली मेख
काँग्रेसच्या पुढच्या राजकीय वाटचालीची मेख सुरत कोर्टाच्या निकालात दडली आहे. मग राहुल गांधींनी अथवा प्रियांका गांधी “डरो मत” किंवा “घाबरू नका”, अशी कितीही ट्विट केली तरी कायद्याच्या कचाट्यातून ते सुटणे कठीण आहे.
कल विपक्षी सांसदों के साथ बैठक होगी। सभी विपक्षी सांसद विजय चौक तक चलकर प्रदर्शन करेंगे। हमने राष्ट्रपति से मिलने का समय मांगा है। सोमवार को दिल्ली और बाकी राज्यों में इसे लेकर प्रदर्शन होगा: सूरत ज़िला कोर्ट द्वारा राहुल गांधी को दोषी करार दिए जाने पर कांग्रेस सांसद जयराम रमेश pic.twitter.com/2QcBMoXcKU — ANI_HindiNews (@AHindinews) March 23, 2023
कल विपक्षी सांसदों के साथ बैठक होगी। सभी विपक्षी सांसद विजय चौक तक चलकर प्रदर्शन करेंगे। हमने राष्ट्रपति से मिलने का समय मांगा है। सोमवार को दिल्ली और बाकी राज्यों में इसे लेकर प्रदर्शन होगा: सूरत ज़िला कोर्ट द्वारा राहुल गांधी को दोषी करार दिए जाने पर कांग्रेस सांसद जयराम रमेश pic.twitter.com/2QcBMoXcKU
— ANI_HindiNews (@AHindinews) March 23, 2023
भाजपची आक्रमक पावले
राहुल गांधी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई अंतर्गत खासदारकी रद्द करण्यासाठी भाजपने आक्रमक पावले टाकली आहेत. या आक्रमक पावलांपासून वाचण्यासाठीच आता काँग्रेसला सर्व विरोधकांची एकजूट हवी आहे. म्हणूनच सुरत निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली काल रात्री काँग्रेसच्या 50 खासदारांची तातडीची बैठक खर्गे यांच्या निवासस्थानी झाली. तब्बल दोन अडीच तास चाललेल्या बैठकीत सर्व विरोधकांची एकजूट करून आज दिल्लीमध्ये आंदोलनाचा धडाका उडवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. विरोधी पक्षाच्या सर्व खासदारांना विजय चौकात जमवून तेथे आंदोलन करून नंतर काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते बाकीच्या विरोधकांसह राष्ट्रपतींना जाऊन भेटण्याचा इरादा राखत आहेत. राष्ट्रपतींची अपॉइंटमेंट मिळाली की ते राहुल गांधींच्या खासदारकी वाचवण्यासाठी राष्ट्रपतींना निवेदन देणार आहेत. या निवेदनाचे नाव लोकशाही वाचवण्यासाठी असणार आहे.
यह सिर्फ कानूनी मुद्दा नहीं है, यह गंभीर राजनीतिक मुद्दा है जो लोकतंत्र से जुड़ा है। यह मोदी सरकार की धमकी, डराने, उत्पीड़न की राजनीति की बड़ी मिसाल है। इसे हम कानूनी तरीके से लड़ेंगे। यह एक राजनीतिक मुकाबला भी है, हम इससे नहीं डरेंगे: कांग्रेस सांसद जयराम रमेश pic.twitter.com/sevdyo3k02 — ANI_HindiNews (@AHindinews) March 23, 2023
यह सिर्फ कानूनी मुद्दा नहीं है, यह गंभीर राजनीतिक मुद्दा है जो लोकतंत्र से जुड़ा है। यह मोदी सरकार की धमकी, डराने, उत्पीड़न की राजनीति की बड़ी मिसाल है। इसे हम कानूनी तरीके से लड़ेंगे। यह एक राजनीतिक मुकाबला भी है, हम इससे नहीं डरेंगे: कांग्रेस सांसद जयराम रमेश pic.twitter.com/sevdyo3k02
भारत जोडोचे यश लंडनमध्ये धुतले
पण राहुल गांधींच्या लंडन दौऱ्यापूर्वी देशात अशी राजकीय परिस्थिती होती, की भारत जोडो यात्रेच्या यशामुळे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधक एकजूट दाखवणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी समोरासमोर टक्कर घेणार. पण राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे सर्व राजकीय यश त्यांच्या लंडन दौऱ्यात धुवून गेले. राहुल गांधींनी केंब्रिजमध्ये आणि लंडनमध्ये इतरत्र भाषणे करताना भारतातल्या लोकशाही वरच आघात केला. त्यामुळे भाजप सारखा सत्ताधारी पक्षच खवळला असे नाही, तर तृणमूळ काँग्रेस, बिजू जनता दल, समाजवादी पक्ष, भारत राष्ट्र समिती यांच्यासारखे प्रादेशिक पक्ष देखील अस्वस्थ झाले आणि त्यांनी काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरू केले. राहुल गांधींच्या लंडन दौऱ्याची ही राजकीय फलश्रुती आहे आणि आता त्या पुढे जाऊन सुरतचा निकाल आल्यानंतर तर राहुल गांधी हे विरोधकांसाठी “पॉलिटिकल लायबिलिटी” बनले आहेत.
बाकीच्या विरोधकांचा प्रतिसाद किती?
देशाच्या राजकीय परिस्थितीत बदललेला हा बारकावा काँग्रेसमधल्या बाकीच्या चाणाक्ष नेत्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही आणि म्हणूनच राहुल गांधींची आता राजकीय आणि कायदेशीर कात्रीत अडकलेली खासदारकी वाचवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी झालेली 50 खासदारांची बैठक हा या प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग होता. पण त्यामुळेच आता काँग्रेसने सर्व विरोधी पक्षांना एकजूट करण्याची हाक दिली असली तरी बाकीचे प्रादेशिक पक्ष राहुल गांधींची खासदारकी वाचवण्यासाठी काँग्रेसला कितपत साथ देतील??, हा प्रश्न तयार झाला आहे. आज काँग्रेसच्या आंदोलनामध्ये नेमके किती आणि कोणते खासदार सहभागी होतील??, त्यातला आकडा नेमका कोणत्या पक्षाचा किती असेल??, यावर काँग्रेसच्या एकजुटीच्या प्रयत्नांना नेमके किती यश येईल, हे अवलंबून असणार आहे.
काँग्रेसचा स्तर घसरल्याची चिन्हे
पण राहुल गांधींच्या राजकारणातल्या आपल्या वकुबानुसार केलेल्या हालचालींमधून काँग्रेसला एक प्रकारे झटका बसला आहे. कारण राहुल गांधींच्या लंडन दौऱ्यापूर्वी स्वतः पुढाकार घेऊन मोदींची टक्कर घेण्यासाठी विरोधकांची एकजूट साधू पाहणाऱ्या काँग्रेसला आता राहुल गांधींची खासदारकी वाचविण्यासाठी विरोधकांची एकजूट करावी लागत आहे. यातच काँग्रेसचा राजकीय स्तर घसरल्याची ठळक चिन्हे दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App