राहुल गांधी आणि शरद पवारांमध्ये साम्य काय??; लाडक्या नेत्यांना मुख्यमंत्री पद देऊ शकले नाय!!

rahul gandhi

नाशिक : राहुल गांधी आणि शरद पवारांमध्ये साम्य काय??; तर ते लाडक्या नेत्यांना मुख्यमंत्री पद देऊ शकत नाय!!, हे राजकीय वास्तव केरळ मधल्या विधानसभा निवडणुकीनंतर समोर आले.Rahul Gandhi and Sharad Pawar couldn’t make their favourites chief ministers

वास्तविक राहुल गांधी आणि शरद पवार यांची तुलना होऊ शकत नाही. दोघांचेही राजकीय कार्यक्षेत्र वेगवेगळे. दोघांचेही वकूब वेगवेगळे, शिवाय दोघेही वेगवेगळ्या पक्षांमध्ये. हे दोघेही आपापल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष. राहुल गांधी अध्यक्ष होऊन गेले. पवार अजूनही अध्यक्ष आहेत.



– राजकीय कर्तृत्वाचा शोध

पण त्या पलीकडे जाऊन राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या राजकीय कर्तृत्वाचा थोडा शोध घेतला, तर एक बाब स्पष्ट झाली, ती म्हणजे हे दोन्ही नेते आपापल्या लाडक्या नेत्यांना मुख्यमंत्री पद देऊ शकले नाहीत. राहुल गांधी एक दोन नव्हे, तर तब्बल पाच लाडक्या नेत्यांना मुख्यमंत्रीपद देऊ शकले नाहीत. केरळ मध्ये राहुल गांधींना म्हणे, के. सी. वेणुगोपाल त्यांना मुख्यमंत्री करायचे होते, पण त्यांच्या ऐवजी व्ही. डी. सतीशन यांच्या नावाला पसंती देणे भाग पडले. कारण केरळ मधल्या सगळ्या नेत्यांनी सतीशन यांच्याच नावाला पसंती दिली.

– राहुल गांधी आणि पाच नेते

2018 मध्ये राहुल गांधींना मध्यप्रदेशात आपले निकटवर्ती ज्योतिरादित्य शिंदे यांना मुख्यमंत्री करायचे होते, पण तिथे कमलनाथ यांचे पारडे जड ठरले. छत्तीसगडमध्ये राहुल गांधी टी. एस. सिंगदेव यांना मुख्यमंत्री करू इच्छित होते, पण त्यांना भूपेश बघेल यांना मुख्यमंत्री करावे लागले. राजस्थानमध्ये सचिन पायलट हे राहुल गांधींच्या यंग ब्रिगेड मधले लाडके नेते होते. पण राहुल गांधी त्यांना मुख्यमंत्री करू शकले नाहीत. राहुल गांधींना त्यांच्या ऐवजी अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री करणे भाग पडले. कर्नाटकात डी. के. शिवकुमार ही राहुल गांधींची पहिली पसंती आहे. पण मुख्यमंत्रीपदाने त्यांना अजून चकवा दिला आहे. याचा अर्थ हाच की राहुल गांधी आपल्या पहिल्या पसंतीच्या नेत्यांना मुख्यमंत्री करू शकले नाहीत.

– पवार, पद्मसिंह आणि नाईक

शरद पवारांच्या बाबतीत आतापर्यंत नेमके असेच घडत आले. 1992 – 93 मध्ये शरद पवारांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून सुधाकरराव नाईक यांना हटवून पद्मसिंह पाटलांना मुख्यमंत्री करायचे होते. पण शरद पवारांना ते जमले नाही. उलट सुधाकरराव नाईक यांना “रिप्लेस” करायला खुद्द शरद पवारांनाच केंद्रीय संरक्षण मंत्री पद सोडून खाली यावे लागले. नरसिंहराव यांच्यापुढे त्यांची मात्रा चालली नाही.

– राष्ट्रवादीच्या नशिबी उपमुख्यमंत्री पद

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नेता मुख्यमंत्रीपदी बसवता आला नाही. आर. आर. पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले. अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर तर शरद पवारांना सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री झाल्याचे पाहावे लागले. पण त्यांच्या मनातली महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री अजून खुर्चीवर येऊन बसू शकली नाही. शरद पवारांना सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री झालेली पाहायची आहे. पण राजकीय कर्तृत्वाअभावी त्यांना ते अजून जमले नाही.

– दोघांमधले आणखी एक साम्य

राहुल गांधी आणि शरद पवार हे साम्य आहे, की आपल्या लाडक्या नेत्यांना ते मुख्यमंत्री पदावर बसवू शकले नाहीत. अर्थात ते राजकीय दृष्ट्या कमकुवत आहेत असा याचा अर्थ होत नाही. उलट त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेकांना अनेक पदांवर चढविले आणि उतरविले. हे दोघेही देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते झाले. पण या दोन्ही नेत्यांचे वेगळे वैशिष्ट्य असे, की हे दोघेही लोकसभेचे विरोधी पक्षनेते असताना पंतप्रधान पदावर भाजपचे नेते बसले. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना शरद पवार लोकसभेतले विरोधी पक्षनेते होते. नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. या अर्थाने दोघांचीही राजकीय कर्तृत्व मोठेच आहे. पण राहुल गांधी आणि शरद पवारांना आपल्या लाडक्या नेत्यांना अजून मुख्यमंत्री करता आले नाही, ही मात्र वस्तुस्थिती आहे.

Rahul Gandhi and Sharad Pawar couldn’t make their favourites chief ministers

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात