जाणून घ्या, राष्ट्रपती मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात नेमंक काय कारण सांगितलं आहे
नवी दिल्ली: पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पुरोहित यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला आहे. पत्रात त्यांनी वैयक्तिक कारणे नमूद केली आहेत.Punjab Governor Banwarilal Purohit sent his resignation to the President
त्यांनी, ‘माझ्या वैयक्तिक कारणांमुळे आणि इतर काही वचनबद्धतेमुळे मी पंजाबच्या राज्यपालपदाचा आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या प्रशासनाचा राजीनामा देत आहे.’ असे बनवारीलाल पुरोहित यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या अधिकृत पत्रात म्हटले आहे. पंजाबसह केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे.
राष्ट्रपती मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘वैयक्तिक कारणांमुळे आणि इतर काही वचनबद्धतेमुळे मी पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश, चंदीगडचे प्रशासक या पदाचा राजीनामा देत आहे. कृपया तो स्वीकारावा.
ऑगस्ट 2021 मध्ये बर्वारीलाल यांनी पंजाबचे 36 वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रविशंकर झा यांनी बनवारीलाल पुरोहित यांना पंजाब राजभवनात पदाची शपथ दिली. बनवारीलाल पुरोहित पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबतच्या तणावामुळे चर्चेत होते.
बनवारीलाल पुरोहित हे तीन वेळा लोकसभेचे खासदार राहिले आहेत. ‘द हितवाद’ या इंग्रजी दैनिकाचे ते व्यवस्थापकीय संपादकही राहिले आहेत. त्यांची प्रतिमा प्रसिद्ध समाजसेवक आणि राष्ट्रवादी विचारवंत अशी आहे. पुरोहित यांना सार्वजनिक जीवनाचा चार दशकांचा अनुभव आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App