विशेष प्रतिनिधी
नागपूर : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आणि भाजप त्यांना राष्ट्रीय पातळीवर सर्वांत मोठा ओबीसी नेता म्हणून प्रोजेक्ट करणार, अशी पुडी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सकाळी सोडली. दिवसभर राज्याच्या राजकीय वर्तुळात त्या पुडीची चर्चा झाली, पण सायंकाळ होता – होता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे आणि अंजली दमानियांची हवा काढली!!The traces of Chhagan Bhujbal’s BJP entry; Fadnavis removed the stakes – Damaniya’s air!!
छगन भुजबळांच्या भाजप प्रवेशा संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सकाळी ट्विट केले. भाजप छगन भुजबळ यांना आपल्या पक्षात प्रवेश देणार आणि त्यांच्यासारख्या भ्रष्ट नेत्याला ओबीसींचा सगळ्यात मोठा चेहरा म्हणून राष्ट्रीय पातळीवर प्रोजेक्ट करणार, असा दावा त्यांनी या ट्विटमधून केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.
स्वतः छगन भुजबळांनी आपल्यापुढे भाजप प्रवेशाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचा खुलासा केला. भुजबळांच्या या वक्तव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुजोरा दिला. भुजबळांना भाजपमध्ये घेण्याचा कोणताही प्रस्ताव आम्ही दिलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पण दुपारनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंजली दमानियांच्या ट्विट मधली सगळी हवाच काढून टाकली. भाजप मधले सगळे निर्णय भाजपचे नेते आणि कार्यकर्तेच घेतात. अंजली दमानिया भाजप मधले निर्णय घेत नाहीत. पण सध्या अंजली दमानिया या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात असल्यामुळे त्या अशा प्रकारची ट्विट करत असतात, असे सांगून फडणवीस यांनी सुप्रिया सुळे आणि अंजली दमानिया यांनी सोडलेल्या पुडीमधली हवा काढून टाकली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App