संभाजीराजेंनी धुडकवली महाविकास आघाडीची कोल्हापूरच्या जागेची ऑफर; स्वराज्य सोडून बाकी कोणत्याही पक्षात जायला नकार!!

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजे हे महाविकास आघाडीच्या कोणत्याही एका घटक पक्षात प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याच्या बातम्या आज दिवसभर प्रसार माध्यमांमध्ये चालल्यानंतर स्वतः संभाजीराजे यांनी ट्विट करून या सर्व बातम्या फेटाळल्या आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडीची आघाडीमधील घटक पक्षांमध्ये प्रवेश करून तिकीट घेण्याची ऑफर देखील त्यांनी धुडकावली आहे आपल्या ट्विटर हँडलवर संभाजी राजे यांनी सविस्तर भूमिका मांडून आपण स्वराज्य पक्षाचा त्याग करून अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले.Sambhaji Raj rejected Mahavikas Aghadi’s Kolhapur seat offer; Refusal to join any other party except Swaraj!!

त्यामुळे छत्रपती संभाजीराजे हे कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून, त्यांनी स्वत: स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातूनच ते आगामी लोकसभा निवडणुकीस सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



संभाजीराजे जरी स्वराज्य पक्षातच राहणार असले तरी, वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून स्वराज्य पक्ष मात्र महाविकास आघाडीचा घटक होऊ शकतो, हे त्यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे.

संभाजीराजेंचे ट्विट असे

स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरू राहणार आहे.

राज्यसभा निवडणुकीतही अशीच ऑफर

अर्थात संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीतल्या कुठल्याही घटक पक्षांमध्ये प्रवेश करण्याची ऑफर धुडकावण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील राज्यसभा निवडणुकीच्या वेळी अखंड शिवसेना असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेत प्रवेश करून राज्यसभेचे तिकीट घेण्याची ऑफर दिली होती. परंतु त्यांनी शिवसेनेत प्रवेश करायला नकार दिला होता. त्यामुळे त्यांनी राज्यसभेचा फॉर्मच भरला नव्हता. पण त्याच राज्यसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रा त प्रचंड खळबळजनक घडामोडी घडल्या आणि त्यानंतरच्या विधानपरिषद निवडणुकीनंतर ठाकरे – पवार सरकार सत्तेवरून पायउतार झाले.

आता देखील संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीतील कुठल्याही घटक पक्षात प्रवेश करून लोकसभेचे कोल्हापूर मधून तिकीट घ्यायला नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या या नकारातून महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात नेमके काय घडेल??, याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Sambhaji Raj rejected Mahavikas Aghadi’s Kolhapur seat offer; Refusal to join any other party except Swaraj!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात