INDI आघाडी शिल्लकच नाही; महाविकास आघाडीच्या बैठकीला जाऊन आल्यावर प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य!!

There is no INDI lead left says prakash ambedkar

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीत प्रवेश मिळावा यासाठी भरपूर प्रयत्न करून महाविकास आघाडीत प्रवेश मिळवलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहिले, पण बैठकीतून बाहेर आल्यावर त्यांनी देशात INDI आघाडी शिल्लकच राहिली नसल्याचे वक्तव्य केले, पण त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्रातली महाविकास आघाडी टिकवून ठेवण्याचा निर्धारही व्यक्त केला. There is no INDI lead left says prakash ambedkar

INDI आघाडीच्या पाटणा, नवी दिल्ली, बंगळुरु आणि मुंबई येथे मॅरेथॉन बैठका पार पडल्या. त्यामुळे भाजपपुढे INDI आघाडीचे कडवे आव्हान असेल असे मानल जात होते. पण आता ही आघाडी शिल्लकच राहिलेली नाही, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले. प्रकाश आंबेडकर यांनी INDI आघाडी तुटल्याची उदाहरणे दिली, पण देशात INDI आघाडीचे जशी तुटली, तशी महाराष्ट्रात महाविकास आघाडी तुटू देणार नाही, असा निर्वाळा दिला.



महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज पुन्हा जागावाटपाबाबत बैठक पार पडली. मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. इंडिया आघाडी शिल्लक राहिलेली नाही. मात्र महाविकास आघाडीचं इंडिया आघाडी होऊ देणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

आमचं आता ठरलेलं आहे, या आघाडीचं इंडिया आघाडी होऊ नये अशी दक्षता घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे ताक जरी असलं तरी फुकून फुकून प्यायचं असं मी ठरवलेलं आहे. इंडिया आघाडी आता शिल्लक राहिलेली नाही. अखिलेश आणि काँग्रेस जे शेवटचे पार्टनर राहिले होते, पण आता दोघेही वेगळे झाले आहेत. काँग्रेस आणि एसपी हे वेगळे चालले आहेत. ते होऊ नये अशी माझी इच्छा आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

There is no INDI lead left says prakash ambedkar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात