विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या राज्यातील 101 केंद्रांचा शुभारंभ दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आला. Inauguration of 101 centers of Pradhan Mantri Vishwakarma Kaushal Samman Yojana in Maharashtra by Chief Minister
पारंपारिक कारागीर आणि हस्तकलेला ओळख प्राप्त करून देणारी प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू केली आहे, या योजनेत महाराष्ट्र अग्रेसर राहील,असा विश्वास व्यक्त करतानाच या योजनेत जास्तीत- जास्त तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या योजनेअंतर्गत 2028 पर्यंत राज्यात साधारण 3 लाख कारागीरांना विकासाच्या प्रवाहात आणणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात कौशल्य विकासासाठी मुंबईसह, नागपूर, पुणे इथं कौशल्य विकास विद्यापीठ सुरु केली आहेत. राज्यात नमो रोजगार अभियानांतर्गत नमो महारोजगार मेळाव्यांचं आयोजन करतो आहोत. नागपूरमध्ये असा यशस्वी मेळावा आयोजित केला, लवकरच ठाण्यामध्ये हा मेळावा होणार आहे. महाराष्ट्र हे उद्योगाभिमुख, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि प्राधान्य देणारं राज्य आहे. त्यामुळंच आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक येतेय. दावोस मध्ये 3 लाख 83 हजार कोटींचे सामंजस्य करार केले असून यातून अनेक रोजगार निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) तसेच जागतिक कीर्तीच्या रुबिका फ्रान्स या प्रसिद्ध डिझाईन संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले.
एनएसडीसीबरोबर केलेल्या करारांतर्गत कौशल्य विकास विकासाचे विविध कार्यक्रम राबविण्यात येतील आणि प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण, प्रमाणपत्र शिवाय क्रेडिट ट्रान्सफर आदी सुविधा दिल्या जाणार आहेत.
रुबिका फ्रान्स संस्थेसोबत केलेल्या करारांतर्गत डिझाईन, अनिमेशन, गेमिंग, युजर इंटरफेस स्कील्स (UI) या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण व आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार आदींचा समावेश आहे. या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थाना डिझाईन क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमास कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आयुक्त डॉ. निधी चौधरी, कौशल्य विकास विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर आदी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more