राहुल गांधींच्या plural politics ची परिणीती कुठे पोहोचली, ते पहा; काँग्रेसचाच खासदार स्वतंत्र दक्षिण भारत देश मागू लागलाय बघा!!


राहुल गांधींच्या plural politics ची परिणीती कुठे पोहोचली, ते पहा; काँग्रेसचाच खासदार स्वतंत्र दक्षिण भारत देश मागू लागलाय बघा!!, अशी अवस्था खरंच आज काँग्रेसच्या विद्यमान राजकारणानेच समोर आणली आहे.Rahul Gandhi’s plural politics has turned into separatist rhetoric!!

काँग्रेसचे बंगलोर मधले खासदार आणि कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे बंधू डी. के. सुरेश यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या निमित्ताने स्वतंत्र दक्षिण भारत देश मागण्याची हिमाकत केली आहे आणि सोशल मीडियातून काँग्रेसवर प्रचंड आगपाखड झाल्यानंतर राहुल गांधी सोनिया गांधी किंवा प्रियांका गांधी यांनी नव्हे, तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना डी. के. सुरेश यांच्या वक्तव्याबद्दल सारवासरव करावी लागली आहे.मोदी सरकारने मांडलेल्या केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पात दक्षिण भारतावर अन्याय केला. दक्षिण भारतातील केंद्र सरकारला तब्बल 4 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळत असताना मोदी सरकारने दक्षिण भारताला काहीही दिले नाही. या अन्यायाच्या निवारणासाठी आम्हाला दक्षिण भारताचा स्वतंत्र देश मागावा लागेल, असे फुटीरतावादी वक्तव्य डी. के. सुरेश यांनी केले. त्यावर सोशल मीडियातून काँग्रेसवर बरीच आगपाखड झाली, पण ही आगपाखड होऊन सुद्धा त्याच्यावर सोनिया गांधी, प्रियांका गांधी अथवा राहुल गांधी यांनी चकार शब्द उच्चारला नाही. उलट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनाच राज्यसभेत बॅकफूटवर जावे लागले आणि सुरेश यांच्या वक्तव्याबद्दल स्वतंत्र मखलाशी करावी लागली. पण काँग्रेसने डी. के. सुरेश यांच्यावर कुठलीही शिस्तभंगाची अथवा कायदेशीर कारवाई केली नाही. शेवटी हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेऊन संसदेच्या शिस्तभंग पालन समितीकडे पाठवले.

पण मूळात प्रश्न हा आहे की काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या खासदाराची स्वतंत्र दक्षिण भारत देश मागण्याची हिंमत होणे हीच अत्यंत गंभीर बाब आहे किंबहुना ती काँग्रेस खऱ्या अर्थाने राहुल गांधींच्या plural politics पॉलिटिक्स ची परिणीती आहे, असेच म्हणावे लागेल. कारण राहुल गांधींनी गेल्या काही वर्षांमध्ये Idea of India या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या संकल्पनेची अशी काही विकृत व्याख्या करून ठेवली आहे की, त्यातून भारताच्या अखंडता आणि एकात्मतेलाच आव्हान दिले गेले आहे.

पंडित नेहरूंची Idea of India आजच्या मोदी सरकारच्या संकल्पनेतील भारतापेक्षा वेगळी होती हे निश्चित, पण म्हणून ती थेट फुटीरतावादी होती आणि राहुल गांधींच्या व्याख्यानुसार ती Union of India अशी होती, असे मानणे संपूर्णपणे चूक आहे.

कारण देशाच्या घटनाकारांनी बिलकुलच तशा फुटीरतावादाला वाव राहील, अशी शक्यताच राज्यघटनेत नमूद करून ठेवलेली नाही. केवळ मोदी सरकारच्या विशिष्ट राजकीय धोरणांना विरोध करण्यासाठी आपण फार मोठी वैचारिक लढाई लढत आहोत, असा आव आणत राहुल गांधींनी त्यांच्या विशिष्ट सल्लागारांच्या सल्ल्यानुसार Idea of India मध्ये स्वतःच्या संकल्पनेतील plural politics ची भेसळ केली. भारताची एकात्मता आणि अखंडचा टिकवणाऱ्या धर्म, संस्कृती, भाषा, समाज आणि जाती घटक या सगळ्या घटकांना त्यातून एक तर दूर सारले किंवा त्यांना फुटीरतावादाचे हत्यार बनविले आणि त्यातूनच डी. के. सुरेश यांच्यासारख्या खासदारांचा बुद्धिभेद होऊन त्यांची स्वतंत्र दक्षिण भारत देश मागण्याची हिमाकत होऊ शकली.

वास्तविक राज्यघटनेत Union of India ही संकल्पना मांडली असली तरी, मूळ राज्यघटनेनुसार भारताचे स्वरूप एकात्म, एकजिनसी आणि अखंडच आहे. कारण राज्यघटनेत कोणत्याही प्रांताला कोणत्याही कारणासाठी अथवा कोणत्याही बाहण्याने देशातून फुटून निघण्याचा अधिकारच घटनाकारांनी ठेवलेला नाही. तसे फुटून निघणे किंवा तसा बहाणा करणे हा खऱ्या अर्थाने देशद्रोह ठरविला आहे.

पण राहुल गांधींच्या संकल्पनेतल्या plural politics ने अर्थात बहुजिनसी राजकारणाने प्रत्यक्षात देशाच्या मूळ एकात्म, एकजिनसी आणि अखंड प्रतिमेलाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. राहुल गांधींच्या संकल्पनेतील plural politics चा “फुटीरतावादाला चिथावणी” हाच खरा अर्थ आहे आणि म्हणूनच त्यांच्याच पक्षातला खासदार आज थेट दक्षिण भारताचा स्वतंत्र देशाची मागणी करू शकला आहे आणि त्याच्या मागणीवर काँग्रेस पक्षाने कोणतीही कारवाई केलेली नाही. देशाच्या एकात्मतेला आणि अखंडतेला सुरुंग लावणारी ही राहुल गांधींच्या plural politics ची परिणीती आहे.

Rahul Gandhi’s plural politics has turned into separatist rhetoric!!

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*