पश्चिम बंगालमध्ये बकरी ईदच्या तीन दिवसांच्या सुट्टीचे लाड बंद; फक्त २८ मे रोजीच सरकारी सुट्टी जाहीर!!

वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आधीच्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारने मुस्लिमांचे केलेले सगळे लाड शुभेंदू अधिकारी यांच्या सरकारने बंद करत आणले असून त्यात बकरी ईदच्या तीन दिवसांच्या सरकारी सुट्टीच्या लाडाचाही समावेश केला.

पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी बकरी ईदच्या तीन दिवसांच्या सरकारी सुट्टीचा रद्द करायचा आदेश काढला. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये आता फक्त २८ हे २०२६ या दिवशी बकरी ईदची सरकारी सुट्टी राहील. २६ मे आणि २७ मे २०२६ हे दोन्ही दिवस सरकारी कामकाजाचे राहतील. या दोन्ही दिवशी सरकारी कार्यालये, संस्था आणि आस्थापने नियमित सुरू राहतील, असे राज्यपालांच्या कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले. यापूर्वी सरकारने तीन दिवसांची सुट्टी जाहीर केली होती. पण आज त्यापैकी दोन दिवसांची सुट्टी रद्द केली.

या आधी शुभेंदू अधिकारी यांच्या सरकारने पश्चिम बंगालमध्ये गोवध बंदी कायदा लागू करून मुस्लिमांचे गोहत्येचे लाड बंद केले. पश्चिम बंगालमध्ये गोवंशाचे रक्षण करायची उपाय योजना केली. मुस्लिम धर्मगुरुंनी हिंदू व्यापाऱ्यांच्या नुकसानीची भीती दाखविल्यानंतर सुद्धा शुभेंदू अधिकारी यांचे सरकार बधले नाही. सरकारने गोवध बंदी मागे घेतली नाही. त्या पाठोपाठ शुभेंदू अधिकारी यांच्या सरकारने आज सलग तीन दिवसांच्या सुट्टीचे आदेश रद्द करून मुस्लिमांचे ज्यादा लाड बंद केले.

Public holiday in West Bengal on 28th May on account of Id-Ud-Zoha (Bakrid).

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात