चिथावणीखोर भाषणे; जेएनयूचा विद्यार्थी शर्जील इमामचा जामीन अर्ज साकेत कोर्टाने फेटाळला


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी शर्जील इमाम याने सीएए आणि एनआरसी कायद्यांच्या विरोधात केलेल्या आंदोलना दरम्यान केलेल्या चिथावणीखोर भाषणाबद्दल त्याला अटक झाली होती. त्यानंतर त्याने जामीनासाठी अर्ज केला होता तो अर्ज दिल्लीच्या साकेत कोर्टाने फेटाळून लावला आहे.  Provocative speeches; JNU student Sharjeel Imam’s bail application rejected by Saket court

शर्जील इमामने सीएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात भाषण करताना आंदोलनकर्त्यांपुढे चिथावणीची भाषा वापरली होती. या देशातले कायदे आपण मानण्याची गरज नाही. हे कायदे हिंदुत्ववादी सरकारने केले आहेत, असा बेछूट आरोप त्याने केला होता. याखेरीज त्याने दिल्लीत दंगलीला चिथावणी देणारी भाषणे देखील केली होती.

पोलिसांच्या आदेश, हुकुमांना देखील मानण्याची गरज नाही, असे तो म्हणाला होता. याबद्दलच साकेत कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

Provocative speeches; JNU student Sharjeel Imam’s bail application rejected by Saket court

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात