महाराष्ट्रात देशाच्या १२ टक्के लसीकरण!,ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन


वृत्तसंस्था

पुणे : देशाने कोरोनाविरोधी लसीकरणाचा १०० कोटी डोस देण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. महाराष्ट्रात १० कोटींहून जास्त लसीकरण झाले आहे. पुण्यात १ कोटी १७ लाख लसीकरण झालं आहे. एकूण राज्याच्या तुलनेत १२ ते १३ टक्के लसीकरण केले. तर देशाच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त महाराष्ट्रानं लसीकरण केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना होऊ नये, यासाठी अधिक काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 12% of the country vaccinated in Maharashtra !; Information of Deputy Chief Minister Ajit Pawar

पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, पुण्यात लसीकरणाचा वेग वाढला आहे. कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. रुग्णसंख्या कमी झाली आहे. ही दिलासादायक बाब आहे.



ज्येष्ठानी अधिक काळजी घ्यावी

दरम्यान, पुण्यात ज्येष्ठाना दुसऱ्या डोसनंतर कोरोना होण्याचे तुलनेनं जास्त आहे, असे सांगताना ते म्हणाले, “पुण्यात पहिल्या डोसनंतर ०.१९ टक्के व्यक्तींना कोरोना झाला तर दुसऱ्या डोसनंतर ०.२६ टक्के लोकांना लागण झाली आहे. त्यात ६०-६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातल्या लोकांचा समावेश आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकाची अधिक काळजी घ्यावी.”

12% of the country vaccinated in Maharashtra !; Information of Deputy Chief Minister Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात