उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नाही वाटते, संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचाऱ्यांच्या रक्षणासाठी परजतेय, चित्रा वाघ यांची टीका


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : १५ दिवसाची बाळांतीण आणि ८ महिन्याच्या गर्भवतीवर बलात्कार झालाय.. अन् संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचाऱ्यांच्या रक्षणासाठी परजतेय, असा हल्लाबोल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.Sanjay Raut’s writing is for protection of corrupt people instead of women’s protection, criticizes Chitra Wagh

उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नसल्यानं संजय राऊत यांच्या पर्यंत औरंगाबाद महिला अत्याचाराची घटना पोहोचली नसेल असा टोलाही त्यांनी लगावला आहे.औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलताना महिला अत्याचारांच्या घटनांवरून राज्य सरकारवर टीका करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला.



चित्रा वाघ म्हणाल्या, कदाचित..उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नसल्यानं संजय राऊत यांच्या पर्यंत औरंगाबाद महिला अत्याचाराची घटना पोहोचली नसेल. तोंडोळी गावच्या घटनेवरून आपण निजामाच्या राजवटीत राहतोय का हा प्रश्न पडलाय.

ओल्या बाळंतीणवर बलात्कार, गर्भवतीवर अत्याचार, दरोडेखोर मोकाट, उरला नाही कायद्याचा धाक. ‘शिवशाही’चं वचन देणाऱ्यांनी ‘निजामशाही’ आणली आहे.तोंडोळी (ता.पैठण) गावात दोन शेतमजूर महिलांवर दरोडेखोरांनी सामूहिक पाशवी बलात्कार केला.

बिहार राज्यातून मोलमजुरी करण्यासाठी आलेले हे दोन दाम्पत्य तोंडोळी गावातील शेतवस्तीवर राहत होते. बुधवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास सात दरोडेखोरांनी शेतवस्तीवर दरोडा घालत दोन महिलांवर पाशवी बलात्कार केला.

यातील एक महिला ही पंधरा दिवसांची बाळंतीण आहे, तर दुसरी महिला ही आठ महिन्यांची गर्भवती आहे. या दोन महिलांवर सात जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. चित्रा वाघ यांनी याठिकाणी भेट दिली.

Sanjay Raut’s writing is for protection of corrupt people instead of women’s protection, criticizes Chitra Wagh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात