शाहरूखच्या मन्नतवर छाप्याचा मीडियाकडून ब्रभा; प्रत्यक्ष छापा नाही, फक्त आर्यनशी संबंधित कागदपत्रे नेली!!


वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्यावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी छापे घातल्याचा ब्रभा प्रसार माध्यमांनी करून घेतला. प्रत्यक्षात मन्नत बंगल्यावर छापा घालण्यात आलेला नाही, तर फक्त आर्यन खानशी संबंधित काही कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांनी पत्रकारांना दिली आहे.Search was conducted this morning, we have given our summons, now we will follow the procedure, can’t disclose further

आज दिवसभर आर्यन खान आणि शाहरुख खान यांच्याशी संबंधित विविध बातम्या प्रसार माध्यमांनी लावून धरल्या होत्या. त्यामध्ये शाहरुख खान आज आर्यनला
आर्थर रोड जेलमध्ये जाऊन भेटल्याच्या बातम्या हे रंगवून लावण्यात आल्या. त्यानंतर बातमी आली ती शाहरुख खानच्या बंगल्यावर म्हणजे मन्नतवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या छाप्याची. पण प्रत्यक्षात छापा घालण्यात आलेला नाही.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी मन्नत बंगल्यावर गेले होते. तेथे काही काळ हजर होते. परंतु प्रत्यक्षात त्यांनी छापा घातलेला नाही तर फक्त आर्यन खानशी संबंधित काही कागदपत्रे तेथून ताब्यात घेतली आहेत, असा खुलासा समीर वानखेडे यांनी केला आहे.

याखेरीज आर्यन खान ची मैत्रीण अनन्या पांडे तिच्या घरावर देखील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा घातला. तिला आतापर्यंत दोनदा नोटीस पाठवण्यात आली होती. परंतु तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे काही अधिकारी तिच्या घरी पोहोचले होते. तिच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे आणि अन्य गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. यापेक्षा कोणतीही बाब उघड करता येणार नाही, असे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे अधिकारी अशोक मुथा जैन यांनी स्पष्ट केले आहे.

Search was conducted this morning, we have given our summons, now we will follow the procedure, can’t disclose further

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण