महिला आरक्षणाविरोधात संसदेत हाणामारी करणारे मुलायमसिंग यादव धाकट्या सुनेचे तरी ऐकणार का.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश निवडणुकीत महिलांना 40 टक्के जागा देण्याच्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या घोषणेचे मुलायम सिंह यांच्या धाकट्या सून अपर्णा यादव यांनी कौतुक केले आहे. आपल्या सासऱ्यांशी आरक्षणाबाबत बोलू असे म्हटले आहे.Will Mulayam Singh Yadav, who has fight in Parliament against women’s reservation, listen to the younger daughter in law

मात्र महिला आरक्षणाच्या विरोधात लोकसभेत हाणामारी करणारे मुलायम सिंह धाकट्या सुनेचे तरी ऐकणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.महिला आरक्षण विधेयक 10 वर्षांपूर्वी राज्यसभेत मंजूर झाले. मात्र काँग्रेस सरकारने लोकसभेत मंजूर केले नाही.त्यापूर्वी केंद्रात देवेगौडा सरकार असताना हे विधेयक मांडले गेले होते.



मात्र त्यावेळी मुलायमसिंग, लालूप्रसाद आणि शरद या तीन यादवांनी तीव्र विरोध केला होता. या मुद्द्यावरून संसदेत इतका गदारोळ झाला की हाणामारीची वेळ आली होती. 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सत्ताकाळात पुन्हा हे विधेयक मांडण्यात आलं, पण प्रचंड विरोध झाल्यानं पुन्हा ते गुंडाळण्यात आलं.

2010 पर्यंत हेच होत राहिलं. 2010 मध्ये राज्यसभेत हे विधेयक एकदाचं मंजूर झाले पण कॉंग्रेस सरकारने ते लोकसभेत मंजूर केले नाही. उत्तर प्रदेश निवडणुकीत गेल्या वेळी सात जागा मिळालेल्या कॉंग्रेसची अवस्था यावेळी त्यापेक्षा खराब आहे.त्यामुळेच काहीच गमावण्याची भीती नसलेल्या काँग्रेसकडून निवडणुकीत महिलांना 40 टक्के जागा देण्याची घोषणा प्रियंका गांधी यांनी केली आहे.

Will Mulayam Singh Yadav, who has fight in Parliament against women’s reservation, listen to the younger daughter in law

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात