नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा बाप काढला; अजितदादा म्हणाले “नो कॉमेंट्स”


विशेष प्रतिनिधी

पुणे : बॉलिवूड सुपरस्टार आर्यन खान याला अटक करून त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी बाप काढला. त्यांना नोकरीवरून घालविणे म्हणाले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्यातल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारला तर त्यावर ते भडकले आणि “नो कॉमेंट्स” असे उत्तर देते झाले. Nawab Malik removed Sameer Wankhede’s father; Ajitdada says “no comments”

अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत जरंडेश्वर साखर कारखाना तसेच अन्य साखर कारखान्यांच्या गैरव्यवहारा संदर्भात सविस्तर निवेदन वाचून दाखविले आणि प्रश्नांना उत्तरे दिली.



परंतु नबाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा बाप काढला आहे त्यावर आपली प्रतिक्रिया काय या प्रश्नावर मात्र अजित पवार पत्रकारांवर भडकले आणि मला प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा अधिकार आहे. तसाच तुमच्या कोणत्याही प्रश्नावर “नो कॉमेंट्स” म्हणण्याचा अधिकार आहे, असे म्हणाले.

नवाब मालिकांचे किंवा समीर वानखेडे यांचे कोणतेही प्रश्न असतील तर ते त्यांचे त्यांनाच विचारा, असे प्रत्युत्तर देखील अजित दादांनी दिले. त्यामुळे नवाब मलिक यांच्या बाप काढण्याच्या वादग्रस्त वक्तव्य संदर्भात संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी भूमिका काय हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला.

Nawab Malik removed Sameer Wankhede’s father; Ajitdada says “no comments”

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात