सरकारने खासगी कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यां चे लसीकरण करून घेण्यास परवानगी दिली आहे. यापूर्वी केवळ कर्मचाऱ्यांनाच लसीकरण करता येईल असे म्हटले होते. मात्र, आता कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांनाही लसीकरण करता येणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.Private companies will be able to vaccinate employees as well as their families
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सरकारने खासगी कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेण्यास परवानगी दिली आहे. यापूर्वी केवळ कर्मचाऱ्यांनाच लसीकरण करता येईल असे म्हटले होते.
मात्र, आता कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांनाही लसीकरण करता येणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेण्यास सरकारने परवानगी दिली होती.
कंपन्यांना केवळ आपल्या कर्मचाऱ्यां चेच लसीकरण करता येणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता. कर्मचाºयांचे कुटुंबीयांचं कंपन्या लसीकरण करू शकणार नाहीत असे स्पष्ट निर्देश दिले होते. कॉपोर्रेट क्षेत्रातून या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त झाल्याने हा निर्णय मागे घेतला आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणा कर्मचाऱ्यांचे कुटुंबियही करून घेऊ शकणार आहेत असे म्हटले आहे.
सरकारच्या या निर्णयानंतर कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचं लसीकरण करता येणार आहे. यामध्ये कर्मचारी, त्यांची पती/पत्नी, त्यांची मुलं, आई-वडील, सासू-सासरे यांचा समावेश करण्यात आला आहे.
कुटुंबीयांपैकी कोणाला लस द्यायची हे कंपनीच्या अंतर्गत धोरणांवरही अवलंबून आहे.आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने यापूर्वी राज्य सरकारांना दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यां च्या कुटुंबियांचे लसीकरण करण्यास मनाई करण्यात आली होती.
त्यानंतर अनेक कंपन्या आणि उद्योग संस्थांनी संभाव्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सरकारकडे हा मुद्दा उपस्थित केला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App