अफानइतकेच यास चक्रीवादळही तीव्र, भारतीय हवामाना विभागाचा इशारा


तोक्ते चक्रीवादळाने केलेला कहर संपत असताना आता यास चक्रीवादळ अतितीव्र होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. २६ मे रोजी हे वादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालचा किनारा ओलांडणार आहे. गेल्या वर्षी याच भागात आलेल्या अफानइतकेच हे वादळ तीव्र असणार आहे.The Indian Meteorological Department warned that the cyclone would be as severe as Afan


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तोक्ते चक्रीवादळाने केलेला कहर संपत असताना आता यास चक्रीवादळ अतितीव्र होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

२६ मे रोजी हे वादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालचा किनारा ओलांडणार आहे. गेल्या वर्षी याच भागात आलेल्या अफानइतकेच हे वादळ तीव्र असणार आहे.



बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागात आणि लगतच्या अंदमान समुद्रात या चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण होणं ही वादळाच्या उदयाची सुरुवात असते,

पण कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यावर प्रत्येकवेळी वादळ अतितीव्र स्वरुप घेईलच असं सांगता येत नाही. २३ मे रोजी सकाळी बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र केंद्रित होईल. हा पट्टा उत्तर वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे.

२४ मेपर्यंत चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच्या २४ तासांमध्ये हे वादळ अतितीव्र होणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवली आहे.

२६ मेपर्यंत हे वादळ वायव्येकडे सरकरणार असून ते तीव्र होत पश्चिम बंगालला लागून असलेल्या बंगालच्या उपसागरात आणि लगतच्या उत्तर ओडिशा आणि बांग्लादेशच्या किनाºयावर पोहोचणार असल्याचा अंदाज आहे.

गेल्या आठवड्यात आलेल्या तौक्ते वादळामुळे गुजरातचा किनारपट्टीचा भाग तसंच पश्चिम किनारपट्टीच्या भागाची प्रचंड प्रमाणात हानी झाली आहे. केंद्र सरकारने सुरक्षेचा उपाय म्हणून पश्चिम बंगाल आणि ओडिशासोबतच आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि अंदमान-निकोबारमधील प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील या राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून किनारी भागामध्ये आरोग्य व्यवस्था अधिक वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

त्याशिवाय, यास चक्रीवादळाच्या मार्गात येणाºयाप्रदेशामध्ये असलेल्या रुग्णालयांमधील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची मदत देण्याचं आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे.

यास चक्रीवादळ २६ मे रोजी पश्चिम बंगाल किंवा ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता गृहित धरून एनडीआरएफ सज्ज झाली आहे. एनडीआरएफनं आपल्या काही टीम तौक्ते चक्रीवादळामुळे बसलेल्या तडाख्यामध्ये बचावकार्य आणि पुनर्वसन कायार्साठी पाठवल्या होत्या.

त्या टीम माघारी बोलावण्यात येत आहेत. तसेच काही तुकड्या पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पाठवायला सुरुवात देखील करण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या प्रवासासंदर्भात हवामान विभागाकडून जसजशी माहिती दिली जाईल, त्याप्रमाणे एनडीआरएफच्या इतर तुकड्या त्या त्या ठिकाणी मदतकायार्साठी पाठवल्या जातील.

The Indian Meteorological Department warned that the cyclone would be as severe as Afan

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात