लसीकरणानंतर शरीरात रक्तस्राव आणि गाठी तयार होण्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाप्रतिबंधक लसीकरणानंतर रुग्णांच्या शरीरामध्ये रक्तस्राव आणि गाठी तयार होण्याचे प्रमाण हे अपेक्षेपेक्षा कमी आहे, अशी माहिती राष्ट्रीय समितीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयास दिली आहे. लस घेतल्यानंतर माणसाच्या शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होण्याचे प्रमाण कमी असले तरीसुद्धा त्यामुळे त्यांचा धोका कायम राहतोच, असेही या समितीने म्हटले आहे. No problem after vaccination

भारतामध्ये अशा पद्धतीने गाठी होण्याचे प्रमाण तपासले असता ते दहा लाखांमध्ये ०.६१ टक्के एवढे आढळून आले असून ते ब्रिटनमध्ये ४ टक्के, जर्मनीमध्ये हेच प्रमाण तब्बल दहा टक्के होते, असेही या समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यासाठी गंभीर आणि अतिगंभीर अशा ४९८ रुग्णांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यातील २६ जणांमध्ये रक्ताच्या गाठी होत असल्याचे आढळून आले आहे.कोव्हिशिल्ड लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारने नियमांमध्ये आणखी बदल केला आहे. त्यानुसार कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्यात आले असले तरी ज्यांनी यासाठी पहिल्यापासून नोंदणी केली आहे त्यांना नव्याने नोंदणी करावी लागणार नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले.
कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर किमान १२ ते १६ आठवड्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला होता. सध्याच्या भीषण लस टंचाईतून सावरण्यासाठीही त्यामुळे सरकारला काहीशी उसंत मिळाली आहे. मात्र ज्यांनी पहिल्या डोस नंतर दुसऱ्यासाठी याआधीच नाव नोंदणी केली, त्यांना वाढीव कालावधीसाठी पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही

No problem after vaccination

महत्त्वाच्या बातम्या