लोकांना धीर देण्याऐवजी विरोधक घाबरवत आहेत, योगी आदित्यनाथ यांचा आरोप


कोरोना काळात लोकांना धीर देणे आणि त्यांची हिंमत वाढवण्याची गरज आहे. मात्र, विरोधी पक्षातील नेते लोकांना घाबरवित आहेत, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.Opponents are intimidating people instead of reassuring them, Yogi Adityanath alleges


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना काळात लोकांना धीर देणे आणि त्यांची हिंमत वाढवण्याची गरज आहे. मात्र, विरोधी पक्षातील नेते लोकांना घाबरवित आहेत, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशातील कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी जिल्ह्यांचे दौरे सुरू केले आहेत. अनेक जिल्ह्यांना भेटी देऊन ते आढावा घेत आहेत. सोमवारी मुझफ्फरनगरमध्ये त्यांनी कोरोना नियंत्रण कक्षापासून आरोग्य विभागाने केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांची माहिती घेतली.



त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, कोरोनाचे संकट असताना विरोधी पक्ष लोकांना भडकवत आहेत. महामारीच्या काळात काही लोकांनी जनतेला धीर देऊन त्यांचा विश्वास वाढवण्याची गरज होती.

मात्र, त्यांनी जनतेला भडकवण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला. विरोधी पक्षांनी भीती दाखवल्यामुळे लोक ऑक्सिजनसाठी धावपळ करू लागले आणि सर्वजण घाबरुन गेले.

योगी म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये 300 ऑ क्सिजन प्लँट उभारण्याचं काम आम्ही करत आहोत. मुझफ्फरनगरमध्येही सहा आॅक्सिजन प्लँट उभारण्यात येणार आहेत. येथे चार प्लँट आधीपासूनच कार्यरत आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, आम्ही आतापासूनच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तयारी सुरू केली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना प्रादुर्भाव होऊ शकतो अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र सर्वांनी या परिस्थितीमध्ये धीर धरणे आणि लोकांना धीर देणे गरजेचे आहे.

देशामध्ये सर्वाधिक कोरोना चाचण्या करणाऱ्या राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेश अव्वल असल्याचे सांगून योगी आदित्यनाथ म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये साडेचार कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. गावांमध्येही ट्रेस, टेस्ट आणि ट्रीटमेंट या पद्धतीने काम सुरू आहे.

लसीकरणही मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत दीड कोटी लोकांचं लसीकरण झाले आहे. राज्यामध्ये प्रादुर्भाव कमी होत आहे. समाजातील गरीब घटकांसाठी कम्युनिटी किचनची सेवा सुरू करण्यात आली आहे. गरीबांना मोफत धान्य देण्यात येत आहे.

Opponents are intimidating people instead of reassuring them, Yogi Adityanath alleges

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात