बॅँकांची एनईएफटी सेवा २३ मे रोजी बंद राहणार

सिस्टिम अपडेट करण्यासाठी बॅँकांची एनईएफटी सेवा २३ मे रोजी बंद राहणार आहे. रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.Banks’ NEFT service will be closed on May 23


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सिस्टिम अपडेट करण्यासाठी बॅँकांची एनईएफटी सेवा २३ मे रोजी बंद राहणार आहे. रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजेच एनईएफटी सेवा २३ मे रोजी काही वेळासाठी बंद राहणार आहे. रिझर्व्ह बँकेनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली.सध्या छोट्या मोठ्या देवाणघेवाणीसाठी युपीआयला अनेकांची पसंती असते. परंतु याद्वारे देवाणघेवाण सरासरी १ हजार रूपयांवर कायम आहे. कोरोना काळात आयएमपीएस द्वारे सरासरी ९ हजार रूपयांपर्यंत ट्रान्झॅक्शन्स करण्यात आली. यापूर्वी ती ६ ते ७ हजारांच्या दरम्यान होती.

रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या माहितीनुसार २३ मे रोजी रात्री ००.०१ मिनिटांपासून दुपारी १४.०० वाजेपर्यंत म्हणजेच दुपारी दोन वाजेपर्यंत एनईएफटी सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत आरटीजीएस प्रणाली मात्र सुरू राहिल.

आरटीजीएससाठी याप्रकारचं अपडेट यापूर्वी १८ एप्रिल २०२१ रोजी पूर्ण करण्यात आलं होतं. अनेक जण मोठी रक्कम देण्यासाठी एनईएफटी सेवेचा वापर करतात. या माध्यमातून रक्कम पाठवण्यासाठी कोणतीही किमान मयार्दा नाही.

Banks’ NEFT service will be closed on May 23