आरटीजीएस सेवा १८ एप्रिल रोजी १४ तासांसाठी बंद राहणार


बॅँकांची रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच आरटीजीएस सुविधा एक दिवसासाठी बंद असणार आहे. १८ एप्रिल रोजी म्हणजे रविवारी १४ तासांसाठी ही सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेने यासंदभार्तील माहिती दिली आहे. RTGS service will be closed for 14 hours on April 18


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : बॅँकांची रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच आरटीजीएस सुविधा एक दिवसासाठी बंद असणार आहे. १८ एप्रिल रोजी म्हणजे रविवारी १४ तासांसाठी ही सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेने यासंदभार्तील माहिती दिली आहे.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार बँक आपल्या ग्राहकांना यासंदर्भात अलर्ट पाठवू शकते. आरटीजीएस सुविधेची सिस्टम अपग्रेड करण्यात येते आहे. त्यामुळे तात्पुरती काही कालावधीसाठी आरटीजीएस सेवा बंद ठेवण्यात येईल. मात्र यादरम्यान पैसे ट्रान्सफर करण्यासंदभार्तील इतर पर्याय किंवा सेवा सुरू राहतील. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर सिस्टम सुरळीतपणे सुरू राहतील.

आतापर्यत बँकांना आरटीजीएस आणि एनईएफटी पेमेंट सेवा वापरण्याची परवानगी होती. मात्रत मागील आठवड्यात आरबीआयने नॉन बँक पेमेंट सिस्टम कंपन्यांनादेखील एनईएफटी आणि आरटीजीएस सेवा वापरण्याची परवानगी दिली आहे. आता प्रीपडे पेमेंट इन्स्ट्रूमेंट ,कार्ड नेटवर्क आणि एटीएम आॅपरेटर रिसीवेबल्स डिस्काऊंटिंग सिस्टम हेदेखील एनईएफटी आणि आरटीजीएस सेवांचा वापर करू शकतील.



आरटीजीएस सेवा ही पैशाची देवाण-घेवाण सर्वात वेगवान सेवा आहे. एनईएफटी सेवेद्वारे पैसे पाठवल्यानंतरदेखील क्रेडिट होण्यासाठी थोडासा कालावधी लागतो. परंतु आरटीजीएस सेवेचा उपयोग मोठ्या रकमेसाठी म्हणजे २ लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम पाठवण्यासाठी केला जातो. जर काही कारणास्तव दुसऱ्या खात्यात पैसे पोचले नाहीत तर सर्व रक्कम आपल्या खात्यात परत पाठवली जाते. या सेवेचा वापर कोणताही खातेधारक करू शकतो.

सध्या डिजिटल व्यवहारांवर सरकारकडून भर देण्यात असल्यामुळे अनेक डिजिटल सेवा बँकेच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळेच रोखीने व्यवहार करण्यापेक्षा विविध डिजिटल सेवांवर भर दिला जातो. शिवाय डिजिटल सेवांमुळे बँकेच्या शाखेत न जाता ग्राहकांना घरबसल्याच आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करता येतात. त्यामुळे वेळेची आणि ऊजेर्चीही बचत होते. शिवाय डिजिटल आर्थिक व्यवहार हे अधिक पारदर्शक असतात. आरटीजीएस, एनईएफटी या सेवांचा लाभ घेत खातेधारक दुसऱ्या खात्यात पैसे पाठवू शकतात.

RTGS service will be closed for 14 hours on April 18

महत्वाच्या बातम्या वाचा…

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात