भारतातील लसीकरणाविरुध्द षडयंत्र : डॉ. शाहिद जमील यांचा राजीनामा आणि जेकब पुलियल यांची लसीविरुध्द याचिका

देशातील १७ कोटींहून अधिक जनतेचे लसीकरण झाल्यावरही तथाकथित लिबरल्सकडून भारतीय लसींवर संशय घेणे सुरूच आहे. जिनोम सिक्वेन्सीन्ग करणाऱ्या गटाचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. शाहिद जमील यांचा राजीनामा आणि लसीकरण मोहीमेचे राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार जेकब पुलियन यांची न्यायालयात याचिका यातून भारतातील लसीकरण मोहीमेविरुध्द षडयंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.Conspiracy against vaccination in India: Dr. Shahid Jameel’s resignation and Jacob Puliyal’s petition against vaccination


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील १७ कोटींहून अधिक जनतेचे लसीकरण झाल्यावरही तथाकथित लिबरल्सकडून भारतीय लसींवर संशय घेणे सुरूच आहे.

जिनोम सिक्वेन्सीन्ग करणाºया गटाचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. शाहिद जमील यांचा राजीनामा आणि लसीकरण मोहीमेचे राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार जेकब पुलियन यांची न्यायालयात याचिका यातून भारतातील लसीकरण मोहीमेविरुध्द षडयंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.जेकब पुलियन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून कोरोना लसीकरणापूर्वी झालेल्या चाचण्यांच्या क्लिनिकल डाटाची मागणी केली आहे. पुरेशा चाचण्या न करताच आपत्कालीन परिस्थितीत लस वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमईआरच्या नियमावलीच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे लिबरल्सचे मुखंड मानले जाणारे प्रशांत भूषण हे त्यांचे वकील आहेत.

जेकब यांनी म्हटले आहे की कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसीच्या चाचण्यांची क्लिनिकल ट्रायल पुरेशा प्रमाणात झालेली नाही. देशातील विविध समाजघटकांमध्ये, विविध वंशाच्या लोकांवर त्याचा परिणाम कसा होईल याची चाचणी करणे आवश्यक होते. मात्र, ती केली गेली नाही. त्याचबरोबर हा डाटा सार्वजनिक स्वरुपात प्रसिध्द करण्यात आलेला नाही.

जेकब यांची याचिका आणि डॉ. शाहिद जमील यांचा राजीनामा एकाच वेळी आले आहे. त्यांनी वैयक्तिक कारणांस्तव राजीनामा दिल्याचे म्हटले असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाविरुध्द हा राजीनामा असल्याची कोल्हेकुई लिबरल्सकडून होत आहे.

देशात १६ जानेवारी २०२१ कोरोना लसीकरणाला सुरवात झाली. त्यावेळी भारत सरकारने ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हेक्सीन या लसींना आपत्कालीन वापराला परवानगी दिली. अमेरिके पाठोपाठ भारतातही लसीकरणाला सुरवात झाली.

पण तेव्हापासूनच देशातील काही तथाकथित विचारवंतांनी त्याला विरोध केला होता. कॉँग्रेसचे माजी मंत्री जयराम रमेश आणि शशी थरुर यांनी कोव्हॅक्सिनच्या विरोधात मोहीमच उघडली होती.

कोव्हेक्सीनच्या तिसºया मानवी चाचण्यांचे निकाल येण्यापूर्वीच सरकारने परवानगी द्यायला नको होती,असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, त्यांनंतर कोव्हेक्सीन लशीची परिणामकारकता कोव्हिशिल्ड पेक्षा जास्त असल्याचे सिध्द झाले आहे.

अमेरिकेच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांनीही हे मान्य केले आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही ही लस प्रभावी ठरली आहे.मुळात देशातील १७ कोटींहून अधिक जनतेचे लसीकरण झाले असताना अशा प्रकारचा संशय घेणे म्हणजे या लोकांमध्ये धास्ती निर्माण करण्यासारखे आहे.

Conspiracy against vaccination in India: Dr. Shahid Jameel’s resignation and Jacob Puliyal’s petition against vaccination

महत्त्वाच्या बातम्या