”माझ्यासाठी सर्वात मोठी जात ही गरीब आहे…”असंही मोदींनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
जगदलपूर : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच प्रचाराला वेग आला आहे. मंगळवारी बस्तरच्या जगदलपूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसेच बिहारच्या जात जनगणनेबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या घोषणाबाजीवरही त्यांनी प्रत्युत्तर दिले. Prime Minister Modi strongly criticized Congress in Chhattisgarh
मोदी म्हणाले, ”कालपासून काँग्रेसवाले वेगळा सूर गाऊ लागले आहेत. जेवढी लोकसंख्या जास्त तेवढे अधिकार जास्त असे ते म्हणतात. मी म्हणतो की या देशात जर सर्वात जास्त लोकसंख्या कोणती असेल तर ती गरीब आहे. त्यामुळे गरिबांचे कल्याण हेच माझे ध्येय आहे. काँग्रेस लोकसंख्येनुसार लाभ देण्याचे म्हणते. काँग्रेसला हिंदूंमध्ये फूट पाडून देशाचे तुकडे करायचे आहेत. माझ्यासाठी सर्वात मोठी जात ही गरीब आहे आणि माझे सरकार गरिबांच्या कल्याणात गुंतले आहे. गरीब दलित असो वा मागास, गरिबांचे भले असेल तर देशाचे भले होईल.”
कांग्रेस ने नया राग अलापना शुरू किया है- जितनी आबादी उतना हक। इससे साफ है कि वो देशवासियों में आपसी खाई और वैर-भाव बढ़ाना चाहती है। सच्चाई ये है कि अगर हक की बात करनी ही है, तो मैं कहूंगा कि इस देश के संसाधनों पर पहला हक भारत के गरीबों का है। pic.twitter.com/fzoT20OG8J — Narendra Modi (@narendramodi) October 3, 2023
कांग्रेस ने नया राग अलापना शुरू किया है- जितनी आबादी उतना हक। इससे साफ है कि वो देशवासियों में आपसी खाई और वैर-भाव बढ़ाना चाहती है।
सच्चाई ये है कि अगर हक की बात करनी ही है, तो मैं कहूंगा कि इस देश के संसाधनों पर पहला हक भारत के गरीबों का है। pic.twitter.com/fzoT20OG8J
— Narendra Modi (@narendramodi) October 3, 2023
याचबरोबर मोदींनी सांगितेल की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काय विचार करत असतील, असा मला प्रश्न पडला होता. देशाच्या साधनसंपत्तीवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क आहे, असे ते म्हणायचे. तोही मुस्लिमांचाच, पण आता काँग्रेस म्हणत आहे की, देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार कोणाचा असेल हे लोकसंख्या ठरवेल? मग आता त्यांना (काँग्रेस) अल्पसंख्याकांचे हक्क कमी करायचे आहेत का? लोकसंख्येनुसार होणार असेल तर पहिला अधिकार कोणाचा असावा? कृपया काँग्रेसवाल्यांनी खुलासा करावा. काँग्रेसला अल्पसंख्याकांना हटवायचे आहे का? त्यामुळे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या हिंदूंनी पुढे येऊन त्यांचे सर्व हक्क घ्यावेत का?
”तीन-तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय?”
याशिवाय मोदी म्हणाले, मी पुनरुच्चार करत आहे की काँग्रेस पक्ष आता काँग्रेसवाले चालवत नाहीत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हे सगळं बघून ना त्यांना विचारलं जातं, ना बोलायची हिंमत होते. आता काँग्रेस आऊटसोर्स झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App