‘देशात पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवले जातात, पण राहुल गांधी…’, गिरीराज सिंह यांचा हल्लाबोल!


बिहार पोलिसांनी १३ जुलै रोजी दरभंगा जिल्ह्यात मिरवणुकीत पॅलेस्टिनी ध्वज फडकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.


विशेष प्रतिनिधी

दरभंगा : केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी मंगळवारी (16 जुलै 2024) माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, देशात पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवले जात आहेत, मात्र राहुल गांधी काहीच बोलत नाहीत.Palestine flags are hoisted in the country but Rahul Gandhi does not say anything criticized Giriraj Singh

भाजप नेते गिरिराज सिंह म्हणाले की, “देशात अनेक ठिकाणी पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवले जातात, मात्र राहुल गांधी आणि सर्व विरोधी नेत्यांनी यावर मौन बाळगले आहे. देशात हिंदूंवर अन्याय होत आहे, पण राहुल गांधी यावर काहीच बोलत नाहीत. मला वाटतं, हरवलेल्या व्यक्तीची शोध सूचना त्यांच्यासाठी चिकटवायला हवी.



काय म्हणाले गिरीराज सिंह?

गिरीराज सिंह म्हणाले की, देशात हिंदूंवर अन्याय होत आहे, मात्र देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी याबाबत बोलताना दिसत नाहीत. मोहरमच्या आधी रविवारी बिहारच्या नवादा येथे मिरवणुकीत पॅलेस्टाईनचा ध्वज फडकावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तिघांना अटक केली.

काय म्हणाले बिहार पोलीस?

वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना बिहारच्या पाकीबारनवाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) महेश चौधरी म्हणाले की, राज्य पोलिसांनी जिल्ह्यातील धमौल भागात घडलेल्या घटनेचा तपास सुरू केला आहे.

महेश चौधरी म्हणाले, “तत्काळ तपास सुरू करण्यात आला. स्थानिक पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारे, मिरवणुकीदरम्यान झेंडा फडकावल्याबद्दल तिघांना अटक करण्यात आली. आवश्यक परवानगी न घेता मिरवणूक काढण्यात आली होती. तो झेंडा तत्काळ जप्त केल्याचे सांगितले. बिहार पोलिसांनी १३ जुलै रोजी दरभंगा जिल्ह्यात मिरवणुकीत पॅलेस्टिनी ध्वज फडकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Palestine flags are hoisted in the country but Rahul Gandhi does not say anything criticized Giriraj Singh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात