आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात शासकीय महापूजा; मुख्यमंत्र्यांचे पाऊस अन् शेतकरी सुखासाठी विठ्ठलाला साकडे


विशेष प्रतिनिधी

पंढरपूर : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्रीविठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक ही शासकीय महापूजा पार पाडली. भाविकांची विक्रमी गर्दी, टाळ मृदुंगाचा जयघोष, भजन, हरिनामाच्या गजराने अवघी पंढरपूर नगरी दुमदुमली.

आषाढी एकादशीनिमित्त यंदा विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय महापूजेचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला. त्यांच्या सोबतच नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे व आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला शासकीय महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा मान मिळाला. अहिरे दाम्पत्य हे नाशिक जिल्ह्यातील अंबासन येथील रहिवासी आहे. हे दाम्पत्य गेल्या 16 वर्षांपासून अखंडपणे पंढरपूरच्या वारीत सहभागी होत वारी करत आहेत.

दरम्यान आषाढी एकादशीनिमित्त यंदा विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय पुजेचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला. त्यांच्या सोबतच नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे व आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला शासकीय महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा मान मिळाला. अहिरे दाम्पत्य हे नाशिक जिल्ह्यातील अंबासन येथील रहिवासी आहे. हे दाम्पत्य गेल्या 16 वर्षांपासून अखंडपणे पंढरपूरच्या वारीत सहभागी होत वारी करत आहेत.

राज्यात भरपूर पाऊस पडू दे…

राज्यातील वारकरी, शेतकरी सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, पिक चांगले येऊ दे, बळीराजाला सुखी-समाधानी राहू दे, असे साकडे आपण विठुरायाच्या चरणी घातल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

माझा शेतकरी सुखी-समाधानी राहू दे…

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, यंदा पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मोठ्या संख्येने वारकरी, बंधू-भगिणी दर्शनाला आले आहेत. राज्यातील कष्टकरी, शेतकरी आणि प्रत्येक घटकाला चांगले आणि सुगीचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना आपण विठुरायाच्या चरणी केल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

पालखी मार्गावर वृक्षारोपणाचा संकल्प करूया- मुख्यमंत्री

वातावरणातील बदलामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘एक वारकरी एक झाड’ ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा सर्वांनी संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या आळंदी ते पंढरपूर पायी वारीच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.​​​​​​

पंढरपुरात टोकन दर्शन व्यवस्था सुरू करणार

तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपुरात टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येईल. यामुळे पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना विठुरायाचे सुलभ आणि कमीत कमी वेळेत पदस्पर्श दर्शन घेता येईल. यासाठी राज्य सरकारकडून 103 कोटी रुपयांचा निधी लवकरच देईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महापूजा संपन्न झाल्यावर मंदिराच्या सभा मंडळात झालेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Official Mahapuja in Pandharpur on the occasion of Ashadhi Ekadashi; Chief Minister’s rain and farmer’s happiness to Vitthala

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात