शेकापचे जयंत पाटील आणि प्रकाश आंबेडकरांचे दावे म्हणायचे तरी कोणत्या कॅटेगिरीतले??


शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे दावे म्हणायचे तरी कोणत्या कॅटेगरीतले??, असे विचारायची वेळ त्यांच्याच वक्तव्यांमुळे आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विशिष्ट स्थान राखून असलेले हे नेते लोकशाही मार्गाने आपापली मते व्यक्त करतात. त्यामुळे त्यांचे एक विशिष्ट महत्त्व निश्चित आहे, पण ही मते व्यक्त करताना ते दोन्ही नेते जे दावे करतात किंवा विशेषतः आज वक्तव्य करताना या दोन्ही नेत्यांनी जे दावे केलेत ते ऐकून आणि वाचून वर उल्लेख केलेला प्रश्न पडला. Jayant patil and prakash ambedkar make tall claims than their political power

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या 4 महिन्यांमध्ये केंद्रातले सरकार कोसळले तिथे मोदी सरकार ऐवजी दुसरे सरकार अस्तित्वात येईल आणि त्याचा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला फार मोठा लाभ होईल, असा दावा जयंत पाटलांनी केला. ज्या जयंत पाटलांनी शरद पवारांच्या भरवशावर विधान परिषद निवडणूक लढवून त्यांना फक्त 12 मिळवता आली. आपल्या पक्षाच्या एकमेव आमदाराचेही मत मिळाले की नाही याची त्यांना खात्री देता आली नाही. किंवा खुद्द शरद पवारांना देखील जयंत पाटलांना आपल्या भरवशावर निवडून आणता आले नाही असे जयंत पाटील जेव्हा थेट केंद्र सरकार 4 महिन्यात कोसळेल, असा दावा करतात त्यावेळी त्या दाव्याला किंवा जयंत पाटलांच्या वक्तव्याला नेमके काय म्हणायचे??, हा सवाल तयार होतो.

जयंत पाटलांच्या एकूणच राजकीय भूमिकेविषयी दाट संशय आहे. त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांना मदत केली म्हणजे अप्रत्यक्षपणे केंद्रात मोदी सरकार आणायलाच मदत केली. या मदतीमागे रायगड जिल्ह्यातील राजकीय आणि आर्थिक गणिते किंवा समीकरणे असल्याचे बोलले गेले. यामध्ये अगदी रायगड जिल्ह्यातल्या काही विशिष्ट कंत्राटांचा देखील माध्यमांनी उल्लेख केला. इथेच जयंत पाटलांच्या संशयास्पद भूमिकेवर माध्यमांनी ठळक प्रश्नचिन्ह लावले. पण विधान परिषद निवडणुकीत मात्र हेच जयंत पाटील शरद पवारांच्या भरवशावर उभे राहिले आणि फक्त 12 आमदारांची मते मिळवून पराभूत झाले. अशावेळी जयंत पाटलांनी थेट केंद्रीय राजकारणावर भाष्य करणे, त्यातही केंद्रातले स्थिर मोदी सरकार 4 महिन्यांत पडू शकते, असा दावा करणे हा राजकीय विनोद नाही, तर दुसरे काय म्हणायचे??, असा असा सवाल आहे.



जे जयंत पाटलांचे, तेच प्रकाश आंबेडकरांचे!!

प्रकाश आंबेडकर यांनी भाजपच्या वळचणीला जाऊन महायुतीच्या सत्तेमध्ये सामील झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेतून बाहेर पडण्याची ऑफर दिली. अजितदादांनी तिसऱ्या आघाडीची चाचपणी केल्याची बातमी आधी आली. ही बातमी येऊन एक दिवस उलटतोय ना तोच, प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना ऑफर दिली. महायुतीच्या सत्तेमधून बाहेर पडून वंचित बहुजन आघाडीशी युती करावी. अजितदादांचे राजकारण पुन्हा एस्टॅब्लिश करण्याची हमी मी घेतो, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी आज छत्रपती संभाजी नगर मधल्या पत्रकार परिषदेत केले.

प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. असं असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठी राजकीय ऑफर दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होत असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. या बातम्या द्यायला काहीच हरकत नाही. ते लोकशाहीतले स्वातंत्र्य आहे.

पण त्या पलीकडे जाऊन प्रकाश आंबेडकर यांनी जो दावा केला आहे, त्यावर खरा सवाल आहे. आपण अजित पवार यांना पुन्हा त्यांचं राजकीय वर्चस्व निर्माण करुन देऊ, असं आश्वासन आणि ऑफर प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. इथेच खरी राजकीय मेख दडली आहे. अजित पवारांचे राजकारण प्रकाश आंबेडकर “रिएस्टॅब्लिश” करणार राजकीय “विनोद” आहे की “ऑफर”??, हा सवाल आहे.

कारण कोणाचेही राजकारण तो नेता “एस्टॅब्लिश” करू शकतो, जो राजकीय दृष्ट्या खऱ्या अर्थाने ताकदवान असतो. इथे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची राजकीय ताकद तोळामासा. त्यांच्या मदतीशिवाय महाविकास आघाडीने महाराष्ट्रात 31 खासदार निवडून आणले. महायुती सारख्या बलाढ्य युतीवरही महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत मात करून दाखवली. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्राच्या जनतेने प्रतिसाद दिला नाही. अशा स्थितीत प्रकाश आंबेडकरांसारखे नेते अजित पवारांना तुमचे राजकारण आम्ही “रिएस्टॅब्लिश” करून देतो, असे सांगणे किंवा असा दावा करणे याला नेमके काय म्हणायचे??, हा सवाल तयार होतो.

त्यातही प्रकाश आंबेडकर यांची ऑफर म्हणजे महायुतीतली हातातली सत्ता सोडून द्यायची आणि प्रकाश आंबेडकर यांची सत्ता येण्याची वाट बघायची. ही ऑफर राजकीय दृष्ट्या व्यवहार्य आहे का??, हा सवाल आहे…आणि त्याहीपेक्षा कळीचा सवाल हा आहे की सिंचन घोटाळ्यापासून शिखर बँक घोटाळ्यापर्यंतच्या गंभीर आरोपांमधून प्रकाश आंबेडकर खऱ्या अर्थाने अजितदादांची सुटका करू शकणार आहेत का??

Jayant patil and prakash ambedkar make tall claims than their political power

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात