आरोग्य शिबिरांना भेट देऊन तिथे उपचार घेत असलेल्या वारकऱ्यांशी संवाद साधला The Chief Minister reviewed the facilities in Pandharpur in the background of Ashadhi Ekadashi
विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : आषाढी एकादशीपूर्वी पंढरपूरात जाऊन तिथे वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयीसुविधांचा आणि स्वच्छतेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला.
यावेळी चंद्रभागा नदीच्या पैलतीरावर असलेल्या ६५ एकर परिसराला भेट देऊन तिथे जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांसाठी केलेल्या विविध सोयी सुविधांचा आढावा घेतला. यात प्रामुख्याने महिला आणि पुरुषांसाठीची स्वच्छतागृह, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची उपलब्धता तसेच शहरातील स्वच्छतेबाबत पाहणी केली.
या भागात प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांना भेट देऊन तिथे उपचार घेत असलेल्या वारकऱ्यांशी संवाद साधला, त्यांना औषधे तसेच पुरेशा वैद्यकीय सोयी उपलब्ध आहेत अथवा नाही याचा आढावा घेतला. त्यानंतर पत्राशेड मध्ये रांगेत उभे असलेल्या वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे जाणून घेतले. या साऱ्यांनी शासनाने वारीसाठी केलेल्या सोयी सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, आमदार समाधान आवताडे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता मदत कक्षाचे मंगेश चिवटे उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App