शाहू महाराज छत्रपती यांनी एक परिपत्रक काढले आहे, ज्यामधून त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत, जिल्हा प्रशासनाची कानउघडणी केली आहे. Shahu Maharaj Chhatrapatis strong displeasure over Sambhaji Raje Chhatrapatis role in the Vishalgarh encroachment case
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : ‘विशाळगड येथील अतिक्रमणे हटवण्याच्या निमित्ताने झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा असून घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. राजर्षीं छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्हयात अशी घटना घडली, हे अत्यंत क्लेशदायक आहे.’ अशा शब्दांत कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी त्यांचे पुत्र आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात विशाळगडवर झालेल्या हिंसक घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
शाहू महाराज छत्रपती यांनी एक परिपत्रक काढले आहे, ज्यामध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे, ‘यासंदर्भात प्रशासनाने विशाळगड़ प्रश्न गांभीर्याने घेऊन माजी खासदार संभाजीराजे व मुख्यमंत्री यांची भेट तसेच चर्चा घड़वून आणावी, अशा सूचना आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांना या घटनेपूर्वी दिल्या होत्या. परंतु, राज्यशासन, प्रशासन आणि पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य ती खबरदारी गांभीर्याने घेतली नाही, त्यामुळे ही घटना घडली. हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अपयश आहे. राज्यसरकारने रविवारी अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाला जे आदेश दिले तेच आदेश यापूर्वी दिले असते, तर ही घटना टळली असती. या हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई करावी.’
याशिवाय, ‘माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी याप्रश्नी आंदोलनाचे नेतृत्व केले आणि सुरूवातीपासून आक्रमक भूमिका घेतली. परंतु त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला, त्याचा आम्ही स्पष्ट शब्दात तीव्र निषेध करतो. हिंसाचारामध्ये ज्या निष्पाप लोकांचे नुकसान झाले, त्यांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी. सरकारने काही केले नाही, तर कोल्हापूरची जनता त्यासाठी पुढाकार घेईल. मंगळवारी आम्ही घटनास्थळी भेट देवून पाहणी करणार आहोत. कोणत्याही समाजघटकांवर अन्याय होत असेल तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे.’ असंही शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितले.
तसेच ‘विशाळगडावरील अतिक्रमण सरसकट काढण्याची कारवाई प्रशासनाने तातडीने करावी. त्या संदर्भात कोणताही दुजाभाव केला जाऊ नये. अशा सूचनाही खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App