एकीकडे नाना पटोलेंच्या गळ्यात भावी मुख्यमंत्र्यांची वीणा; दुसरीकडे काँग्रेस आमदारांकडून असंतोषाच्या ठिणग्या!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात 14 जागांचे लक्षणीय यश मिळाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासकट अनेकांच्या महत्वाकांक्षा फुलल्या. काल पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात तर उत्साही कार्यकर्त्यांनी नानांच्या गळ्यात भावी मुख्यमंत्री म्हणून वीणा घातली. त्यामुळे नानांचा उत्साह दुणावला. पण पण वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा अधिक काही मिळत नाही असे सांगून नानांनी आपण जमिनीवर असल्याचे दाखवून दिले. Political unrest in Congress against nana patole

पण एकीकडे नानांच्या गळ्यात भावी मुख्यमंत्र्यांची वीणा कार्यकर्त्यांनी घातली असताना दुसरीकडे त्यांना काँग्रेस आमदारांच्या असंतोषाच्या ठिकाणी सहन कराव्या लागत आहेत.

नाना पटोले यांच्या विरोधात सध्या अनेक आमदारांमध्ये खदखद असल्याचे बोलल जात आहे. काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी नाना पटोलेंवर थेट आरोप केले आहेत. नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज आहेत. शपथ घेऊनही त्यांनी माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यावर आरोप केले. तसेच नाना पटोले यांनी मतदारसंघात काय चाललंय, याबद्दल कधीच विचारलं नाही, असा आरोप हिरामण खोसकर यांनी केला आहे.

आमदारकीचे तिकीट द्यायचं नसेल तर देऊ नका. पण बदनाम करु नका. मी याबद्दल कार्यकर्त्यांशी बोलून पुढील भूमिका ठरवणार आहे. तसेच पक्षश्रेष्ठी हे माझी बदनामी करत आहेत. काँग्रेसचे अनेक आमदार अध्यक्षांवर नाराज असून त्यांनी वरिष्ठांना तक्रार केली आहे, असेही हिरामण खोसकर यांनी सांगितले.

विधान परिषद निवडणुकीत मी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं. याबद्दल मी शपथ घेऊन सांगितलं, तरी माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याबद्दल चुकीची माहिती पसरवली गेली. ज्यांचे मत फुटले, त्या 6 जणांवर कारवाई नाही आणि शपथ घेऊन सुद्धा माझ्यावर मात्र आरोप करण्यात आला. मला उमेदवारी द्यायची नसेल तर नका देऊ, पण बदनाम करू नका. पक्षश्रेष्ठी माझी बदनामी करत आहेत. हे चांगलं नाही, असेही हिरामण खोसकर म्हणाले.

नाना पटोलेंविरोधात वरिष्ठ नेत्यांना तक्रार

पक्षश्रेष्ठींनी मला एकदाही विचारलं नाही की मतदारसंघात काय चाललाय. ते भेटले की फक्त असं का केलं आणि तसं का केलं, इतकंच विचारतात. नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज आहेत. मी त्यांची नावं सांगणार नाही. पण अनेक आमदारांनी नाना पटोलेंबाबत वरिष्ठ नेत्यांना तक्रार केली आहे, असा खुलासाही हिरामण खोसकर यांनी केला. जर मला उमेदवारी दिली नाही, तरी मी थांबणार नाही. कार्यकर्त्यांशी बोलून मला पुढची भूमिका घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले.

Political unrest in Congress against nana patole

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात