नवज्योतसिंग सिध्दू आणि विक्रमसिंह मजिठिया यांना धोबीपछाड देणाऱ्या या आहेत सामाजिक कार्यकर्त्या पॅडवुमन

विशेष प्रतिनिधी

अमृतसर : अमृतसरमध्ये कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू आणि माजी मंत्री विक्रमसिंह मजिठिया एकमेंकाविरुध्द राणा भीमदेवी थाटाचे दावे करत होते. परंतु, आम आदमी पक्षाच्या सामाजिक कार्यकर्त्या जीवन ज्योत कौर यांनी दोघांनाही धोबीपछाड दिली. त्या पॅडवुमन म्हणूनही ओळखल्या जातात.Navjyot Singh Sidhu and Vikram Singh Majithia have been laundered by social activists Padwoman

अमृतसर पूर्व जागेवर काँग्रेसचे नवज्योतसिंग सिद्धू आणि बिक्रम सिंह मजिठिया यांच्यात लढत होईल असे मानले जात होते. मात्र याच्या उलट आम आदमी पक्षाच्या उमेदवार जीवन ज्योत कौर यांनी विजय मिळविला. जीवन ज्योत कौर या सामाजिक कार्यकर्त्या असून श्री हेमकुंट एजुकेशन सोसायटीच्या संस्थापक आहेत. त्यांची संस्था गरजु मुलांना शिक्षण देते.



त्याचबरोबर कौर या प्लॅस्टिक सॅनिटरी पॅडच्या दुष्परिणामांवर जागृती करतात. त्यासाठी त्यांनी एका स्विस कंपनीसोबत करार केला आहे. ग्रामीण महिलांना त्यांच्या संस्थेच्या वतीने मोफत सॅनिटरी पॅड दिले जातात. शिक्षण आणि साक्षरता, आरोग्य, झोपडपट्टी पुनर्वसन, महिला सशक्तीकरण आदी कार्यात त्या व्यस्त आहेत.

जीवनज्योत या अगदी सुरूवातीपासून आपसोबत काम करतात. त्या आपच्या प्रवक्ता होत्या. त्याचबरोबर आपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी एलएलबीची पदवी घेतलेली आहे.दरम्यान, पराभवाचा धक्का बसल्यावर नवज्योत सिंग सिध्दूयांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लोकांचा आवाज हा देवाचा आवाज आहे.

पंजाबमधील लोकांचे मत मी नम्रपणे स्वीकारतो.आपचे अभिनंदन. या ट्विटवर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सिद्धू साहेब आता रिकाम टेकडे झाले आहेत.पंजाबमध्ये लोकांना आणखी नाटक आणि कॉमेडी नको आहे, असेही म्हटले आहे. लोकांनी नवज्योत सिंग सिद्धू यांना पुन्हा टीव्ही जॉईन करण्याचा सल्लाही दिला.

Navjyot Singh Sidhu and Vikram Singh Majithia have been laundered by social activists Padwoman

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात