UP Elections Modi : लिहून घ्या, राजकीय घराणेशाही जनता मोडून काढेलच; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : लिहून घ्या, एक ना एक दिवस भारतातील जनता राजकीय घराणेशाही मोडून काढेलच!!, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्या विजयी मेळाव्यात विरोधकांवर हल्लाबोल चढवला. UP Elections prime minister modi

उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवल्यानंतर नवी दिल्लीत भाजप मुख्यालयात झालेल्या विजयी मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रादेशिक पक्षांची घराणेशाही आणि भ्रष्टाचार यावर प्रखर हल्लाबोल केला. त्याच वेळी त्यांनी केंद्रीय तपास संस्थांच्या कारवाईचे जोरदार समर्थन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की हा देश राजकीय घराण्यांनी भ्रष्टाचाराने पोखरून काढला आहे. या राजकीय घराण्यांविरुद्ध देशातल्या जनतेत प्रचंड असंतोष आहे. आज हे तुम्ही लिहून ठेवा, एक ना एक दिवस या देशातली जनता ही घराणेशाही मोडूनच काढेल!!, असे उद्गार पंतप्रधान मोदींनी काढले.

– राजकीय विद्वानांना सुनावले

या देशातले अनेक राजकीय विद्वान उत्तर प्रदेशासारख्या राज्याला कायम जातिवादाच्या चष्म्यातून पाहत होते. जातिवादाच्या पलिकडे त्यांचे विश्लेषण जात नव्हते. पण आता उत्तर प्रदेशातल्या जनतेने विशेषत: या महिलांनी आणि तरुणांनी जातीच्या पलिकडे जाऊन मतदान केले आहे आणि त्यांनी भाजपला विजयी केले आहे. आता ही देशातल्या विद्वानांची जबाबदारी आहे की त्यांनी जातिवादाचे चष्मे उतरवून विजय अथवा पराजय याचे विश्लेषण केले पाहिजे.

– प्रादेशिक घराणेशाहीवर हल्ला

याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रादेशिक राजकीय घराणेशाहीवर जोरदार प्रहार केला. केंद्रीय तपास संस्था भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी पुढे येतात. त्या नि:पक्षपाती संस्था असताना देखील प्रादेशिक घराणेशाहीतले लोक या संस्थांच्या विरुद्ध वेगवेगळ्या पद्धतीचे वातावरण तयार करतात. त्याला जातिवादाचा, धर्मवादाचा, प्रांतवादाचा रंग देतात. पण भ्रष्टाचाराचा बीमोड करण्यासाठी आम्ही 100 % केंद्रीय तपास संस्थांच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी दिली.

– घराणेशाहीचा भ्रष्टाचार मोडा

राजकीय घराणेशाहीचे लोक हजारो कोटींचा भ्रष्टाचार करतात आणि भ्रष्टाचार लपवण्यासाठी जात – धर्म – प्रांत या मुद्द्याचा आधार घेऊन केंद्रीय तपास संस्था आणि न्यायालयाच्या नि:पक्षपातीपणा विरुद्ध आवाज उठवत राहतात. यामध्ये त्यांना देशातल्या राजकीय विश्लेषक विद्वानांची देखील साथ मिळताना दिसते. यावर देखील मोदींनी हल्लाबोल केला.

– जातिवादा पलिकडचे यश

भाजपचा विजयाचे रहस्य जातिवादाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांच्या कल्याणकारी योजना राबवल्या मध्येच आहे. देशातल्या युवा शक्तीचा विधायक वापर करून त्यांना संधी देण्यात आहे, हे भारतातल्या राजकीय विद्वानांच्या लक्षात येत नाही किंवा लक्षात आले तरी ते मांडत नाहीत. ते प्रादेशिक पक्षांच्या घराणेशाहीच्या चष्म्यातूनच आणि जातिवादाच्या मानसिक तेथूनच विजय किंवा पराभवाकडे बघतात, असे शरसंधान पंतप्रधान मोदींनी केले.

– योजनांची यशस्विता

उत्तर प्रदेशासह चार राज्यांमध्ये केंद्रातल्या योजना यशस्वी झाल्या. सर्वसामान्यांचे जीवन सुकर झाले आणि म्हणूनच जनतेने भाजपला एवढे भरभरून मतदान केले, याकडे त्यांनी आवर्जून लक्ष वेधले. भाजपच्या विजयात महिलांचा युवकांचा सर्वात मोठा वाटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशात 2022 च्या निकालांनी 2024 ची वाट मोकळी केली आहे असेही ते म्हणाले.

UP Elections prime minister modi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात