उत्तर प्रदेशात विकासाची मोदी एक्सप्रेस, कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची उद्घाटने


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात मोदींची विकास एक्सप्रेस सुरू झाली आहे. कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची भूमिपूजने आणि उद्घाटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत आहेत.पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशातील २२ हजार कोटींहून अधिक खर्चाच्या पूर्वांचल एक्स्प्रेस-वेचे मंगळवारी उद्घाटन केले.Modi Express for development in Uttar Pradesh, inauguration of development works worth crores of rupees

पूर्वांचल एक्स्प्रेस-वे च्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी स्वत: दाखल झाले होते. आता पंतप्रधान मोदी पुन्हा यूपीच्या दौºयावर जाणार आहेत. पूर्वांचल एक्स्प्रेस-वेनंतर पंतप्रधान मोदी अर्जुन सहायक प्रकल्पाचे (अर्जनु बांध) उद्घाटन करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यासाठी १९ नोव्हेंबरला यूपीच्या दौºयावर जाणार आहेत.



पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ नोव्हेंबरला ६,२५० कोटी रुपयांहून अधिकच्या विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. पाण्याची टंचाई कमी करणे आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी पुरवठा केलेल्या जाणाºया महोबा अर्जुन प्रकल्पाचे पंतप्रधान मोदी उद्घाटन करतील. याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली.

जिल्हा प्रशासनाकडून महोबा प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या तयारी करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज या प्रकल्पाचे निरीक्षण केले. यासोबतच त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही दिल्या.

यावेळी जलशक्ती मंत्री डॉ. महेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अर्जुन प्रकल्पाची उपयोगिता आणि त्याच्या तांत्रिक बाजूंची माहिती दिली. महोबा अर्जुन सहायक प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदी हे जाहीर सभेला संबोधित करतील.

अनेक बांध जोडून अर्जुन सहायक प्रकल्प तयार करण्यात आला आहे. हा प्रकल्प अडीच हजार कोटींचा आहे. या सिंचन प्रकल्पाचे स्वरुप नदी जोड योजनेसारखे आहे. जवळपास १२ वषार्पासून बांधण्यात येत असेलल्या या प्रकल्पावर तीन पट वाढली. बुंदेलखंडमधी महोबा, हमीरपूर आणि बांदा जिल्ह्यातील १६८ गावांमधील दीड लाख शेतकऱ्यांना या सिंचन प्रकल्पाचा थेट लाभ होणार आहे. तर ४ लाख नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणार आहे.

Modi Express for development in Uttar Pradesh, inauguration of development works worth crores of rupees

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात